भारतीय कला आणि आपण

दिनांक 9जूलै  2019 ची ही गोष्ट आहे,  मी डिडी इंडीया नामक वाहिनी बघत होतो.  त्या वाहिन्यावर ईशान्य
भारतातील नृत्यप्रकारावर तयार केलेला एक माहितीपट (ड्याक्युमेंटरी) दाखवत होते.  माहीतीपट छान होता त्यामुळे मला खुप छान माहिती मिळाली.  त्या माहितीची मी पुनरावत्ती काही करत नाही, कारण त्या  कार्यक्रमाचे पुर्नप्रक्षेपण होते का?  यासाठी साठी तरी तूम्ही ती वाहिनी बघाल.  त्या शोध मोहिमेत जसे कोलंबसला भारत शोधताना अमेरीका सापडली तशाच अन्य चांगला कार्यक्रम सापडु शकतो . तेव्हा तूमचा तो आनंद मी का म्हणून हिरवावा ? आणि  दुसऱ्याने सांगितल्यापेक्षा एखादी गोष्ट स्वता:हून करण्यातली मजा काही औरच असते.
                         त्यावेळी विचार आला आपल्या भारतात नृत्याचेच  किती प्रकार आहेत . कुचीपुडी भरतनाट्यम मोहिनीअट्टम असे काही सुप्रसिध्द प्रकार आपणास ज्ञात असतात.  माञ खास या लोककलेला समर्पित अशा कार्यक्रम  कोणत्याच वाहिनीवर होताना दिसत नाही . त्याची माहीती करुन देण्यासाठिचा कार्यक्रम  डि डी वाहीन्याचा अपवाद सोडून  फारसे होत नाही .नाही म्हणायला एका मोठ्या  स्वदेशी माध्यम समुहाचा  ज्यांचा  बहूसंख्येने वाहिन्या आहेत त्याचा  मराठी वृत्त वाहिनीवर लोकभाषेतून बातम्या देण्याचा कार्यक्रम केला होता.  माञ आपल्या लोककला फक्त त्याचापाशीच थांबतात असे नाही . जरी महाराष्टाचा विचार केला तरी  फकक्ड , लावणी ,तमाशा  गोंधळ , भारुड ,किर्तन असे प्रकार सापडतात .  किर्तनात सुध्दा वारकरी किर्तन आणि  नारद किर्तन तर लावणीत नाच्याची लावणी तसेच बैठकीची लावणी असे प्रकार पडतात.  त्यांची माहिती देणारा कार्यक्रम मला तरी माहिती नाही जर कोणत्याही वाहिनीवर असा कार्यक्रम होत असल्यास  क्रुपया मला सांगा वरती सांगितलेल्या लोक कला आपल्या 29 राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या भारतातील एका महाराष्ट्र नावाचा राज्यातील  आहेत.

                       म्हणजेच आपल्या देशात किती लोककला असतील याचा अंदाज करा आणि ही यादी परीपुर्ण आहे , अशा माझ्या दावा नाही . ही फक्त मला माहिती असणाऱ्या लोककलाची आहे मला माहिती नसणारे सुध्दा काहि लोककला अस्तिवात आहेत याची मला पुर्ण जाणीव आहे.  एखाद्या पुस्तकात हे वाचण्यापेक्षा दुरचिञवाणीच्या पडद्यावर हे बघीतले तर मला तरी अधिक चांगल्या रितीने समजू शकते तरी याची माहिती असणाऱ्या  पुस्तकापेक्षा माहितीपटाला किंवा दुरचिञवाणी कार्यक्रमाला मी अधिक प्राधान्य देइल
                                   तर सांगायचा मुद्दा हा की जरी हे जग जागतिकरणाचे असले आणि  आपण सायंकाळी मिञांबरोबर भारतात  अमेरीकन कंपनी असलेल्या मँकडोनाल्डमध्ये बसून सिंगापूरी नुडल्स जरी खात असलो तरी आपल्या लोककलाची माहिती असायलाच हवी.
अर्थात या विषयी खुप काही बोलण्यासारखे आहे पण तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?