गायकी क्षेत्रातील टँजिडी क्वीन गिता दत्त

             
       जूलै महिन्याची 20 तारीख उजाडली की सिने चाहत्यांना  आठवण होते ती ,गिता दत्त यांची .अविट गाण्याची प्रतिभा लाभलेली असून देखील , प्रतिभावन तसेच अत्यंत हळव्या मनाचा आपल्या पतीचा आग्रहास्तव त्याने निर्माण केलेले, दिग्दशीत केलेले अथवा त्याने अभिनेता म्हणून काम केलेले चित्रपट वगळता अन्यत्र फारसी  न गायलेली गायिका गिता दत्त .पतीच्या विवाह्यबाह्य  प्रेमप्रकरणाला कडाडुन विरोध करणारी गायिका म्हणजे गिता दत्त .एका प्रसिद्ध सिने अभ्यासकाचा मते  गीता दत्ता या गायीका क्षेत्रातील मिनाकुमारी आहे ज्याप्रमाने अंगी प्रचंड गुणवत्ता असूनही दुर्देवाच्या फेऱ्यात अडकल्याने मिनाकुमारी अभियानाच्या क्षेत्रात जास्त पुढे जाउ शकल्या नाहीत तोच प्रकार काहीसा गीता घोष चौधरी यांच्या बाबत घडला. 
                 गीता दत्त यांच जन्म सध्याचा बांगलादेशातील फत्तेपुर या गावी एका जमिनदार कूटूबात झाला. 1942 च्या सूमारास त्यांच्या कुटुबियांनी मुंबईत स्थलांतर केले .त्यांच्या  सिनेकारकर्दीची सूरवात 1946 च्या आसपास होते. फारसे गायकीचे शिक्षण न घेता अंगभूत असणाऱ्या गूणाव्दारे त्यानी सिनेगायकीय सूरवात केली .
                 बाझ या चित्रपटाच्या दरम्यान त्यांची ओळख गूरूदत्त यांच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर लवकरच प्रेमात होउन त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांना 3 अपत्ये झाली तरूण आणि अरूण ही 2 मुले आणि एक मूलगी ही त्यांची अपत्ये. त्यातील तरूण यांचे 1985 ला निधन झाले. 2014 साली त्यांच्या अरूण या मूलाचे पुण्यात वयाच्या 60 व्या वर्षी किडनी फेल होउन निधन झाले. स्वत: गीता दत्त 1972 साली अत्यंत दुर्देवी स्थितीत गेल्या .
                1964 ला त्यांचे पती गुरुदत्त यांचे निधन झाले . त्या  धक्यातून  स्वत:स सावरण्यासच त्यांना कैक महिने लागले . त्याना गूरुदत्तच्या अकस्मीत जाण्याचा इतका गंभीर धक्का बसला की काही स्वत:च्या मूलांना देखील ओळखत नसल्याचे उललेख आहेत . या धक्यातून सावरताना त्यांना मद्य सेवनाचे व्यसन लागले.

त्यातून उदभवलेल्या आजारातून त्यांनी जगाचा निरोप घेतला .
त्यांची गाजलेली गाणी म्हणजे चौदहवी का चाँद. त्यांच्यात खूच गूणवत्त असून देखील गुरूदत्त यांच्या आग्रहास्त्व त्यांनी गुरूदत्त फिल्म प्रॉडक्शनशिवाय अन्यत्र फारशी गाणी गायली नाहीत. गीता दत्त यांच्या विषयी बोलताना गुरु दत्त आणि  वहिदा रेहमान यांचा विषय येणे क्रमप्राप्त आहेच वहिदा रेहमान आणि गीता दत्त पुर्णत: जोडल्या गेल्यात . एकीचा उल्लेख आल्यावर दूसरीचा उल्लेख येणे क्रमप्राप्त आहे
                    वहिदा रेहमान यांचे वडील आय सी एस अधिकारी होते . त्यावेळच्या मद्रास प्रांतात त्यांची नेमणूक करण्यात आली होती . तत्कालीन मद्रास प्रांतांत सघ्याचा आंध्रप्रदेश तेलंगणा आणि तामिळनाडू राज्याचा समावेश होतो . या प्रंतात सातत्याने बदली होत असल्याने त्याचा व्यक्तिमत्तवर याचा सकारात्मक  परीणाम झाला. वहिदा रेहमान यांच्या सिने स्रूष्टीतील प्रवेश तेलगु चित्रपटामार्फत झाीला. त्या उत्कृष्ट  नुत्यांगंणा होत्या . एकदा काही कामानिमित्य गुरूव्‍दत्त्‍  हैद्राबाद येथे गेले असता मिळालेल्या मोकळया वेळेचा सदूपयोग व्हावा याहेतूने आयोजकांनी त्यावेळच्या चित्रपटातग्रूहातीलां गर्दी खेचणाऱ्या तेलगू चित्रपटातील ‍अभिनेत्रीची भेट घालून दिली त्याच  वहिदा
रेहमान .वहिदा रेहमान त्यावेळी 16/17 वर्षाच्या होत्या  वहिदा रेहमान यांनी गुरूदत्त्‍ फिल्मच्या सी आय डी या चित्रपटाव्दारे हिंदी चित्रपटस्रुष्टीत पदार्पण केले.  गूरुदत्त फिल्म प्रॉडक्शनच्या प्यासा या चित्रपटाव्दारे त्या विख्यात झाल्या. नंतर त्यांनी विविध चित्रपटात भुमिका केल्या . गाईड या चित्रपटासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर पूरस्कार मिळाला. आतापर्यत त्यांना दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांना पदमश्री आणि पदमविभुषण्‍ पुरस्कार देउन त्यांचा गौरव भारत सरकारकडून करण्यात आलायं. त्यातील प्रमूख चित्रपट हे गुरूदत्त्‍ फिल्मचेच होते. वहिदा रेहमान यांच्या कारकर्दीचे दोन टप्पे पडतात .पहिला टप्पा हा त्यांचा सुरवातीपासून 1975 पर्यत आहे दूसरा टप्पा 2000 ते 2010 पर्यत आहे. वहिदा त्यांचा पालकांचे शेंडेफळ आहे. त्यांना त्याच्यापेक्षा मोठया 3 बहिणी आहेत. वहिदा आपल्या मतांविषयी ठाम असतात . हा ठामपणा त्यांचा आयूष्यात पहिल्यापासून आहे. गुरूदत्त फिल्म मध्ये सुरवातीला करार करताना त्यांनी आपल्या करारीपणाचे दर्शन गुरूदत्त यांना दाखवले. किंबहूना या करारीणामूळेच गुरुदत्त त्यांच्याकडे  आकर्षिले गेले असावेत . मात्र त्यामुळे गिता दत्त यांना प्रचंड हाल अपेष्ठा सहन कराव्या लागल्या .हे मात्र विसरता येणे अशक्य .
              गुरुदत्त यांच्या विषयी बोलायचे झाल्यास आयूष्यातील दु:खे समस्या अडचणी सहजतेने रुपेरी पडद्यावर साकारणे,   आणि त्यातून मनोरंजन करणे हा त्यांचा चित्रपटाचा मुख्या विषय होता .प्यासातून मानवी आयुष्यातील रक्तच्या नात्याती निरर्थकता गुरूदत्त यांनी प्रभावीपणे मांडलीये बंगाली वाटणारे गुरुदत्त हे त्यांचे टोपण नावत्यांचे खरे नाव वसंत शिवशंकर पदुकोण . मात्र ते तयांच्या टोपण नावानेच प्रसिद्धीस आले . त्यांचे सुरवातीचे काही आयुष्य कोल्हापुरात गेले . त्यांच्या युष्याचा बराचसा काळ बंगाल मध्ये गेला . बंगाल चा प्रभाव  त्यांच्यावर प्रचंड प्रमाणत पडल्या .  प्यासा  मध्ये हा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो देखील. गुुरुदत्त यांंच्याशी विवाह 1952च्या सुमारास विवाह केल्यावर त्यांचा संसार 1956 पर्यत सुरळीत चालला , मात्र गुरुदत्त यांच्या आयुष्यात तेलगू भाषिक मुस्लीम धर्मिय वहिदा रेहमान यांचा प्रवेश झाला . आणि सारे चित्र झपाट्याने बदलत गेले . पुढे या कारणावरुन त्यांचा घटस्फोट झालाक्ष. गीता दत्त आपल्या मुलांसह माहेरी राहू लागल्या .
    9 आँक्टोबर1964 च्या रात्री जर त्यांनी आपल्या मुलांना गुरुदत्त यांना भेटू दिले असते तर ! मात्र कदाचित नियतीला हे मान्य नसावे . त्या धक्यातून गुरुदत्त यांचे निधन झाले . आणि कालांतराने गीता दत्त यांना काळाने आपल्या पडद्याच्या आत घेतले ते यावरुनच . जर हे झाले नसते तर हिंदी चित्रपटसृष्टीला एक छान गायीका मिळाली असती . त्याच्या जाण्याने आपण एक महान गायीकेला गमावले . 2019 साली त्याचा जाण्याला 47वर्षे होतील .मात्र आजही त्यांची गीते आनंदने ऐकली जातात . यातच सगळे आले .आपणही या गायीकेच्या गीतांच्या आस्वाद घेवूया . खाली दिलेल्या युट्युब लिंकवर क्लिक केल्यास आपणास ही गीते ऐकता येतील .
https://www.youtube.com/watchv=2xyr2AxNKcY&list=PLoJpglut0ZpHQHBBF6we16rdCfWVF3l3y


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?