पाऊस बदलतोय

                कधी येणार, कधी येणार ? म्हणून उच्छुकता असणारा मान्सून अखेर  जवळपास १५ दिवस उशिरा का होईना राज्यात  दाखल झाला .  त्यामुळे सर्वत्र आनंदीआनंद  निर्माण झाला खरा मात्र हा आनंद
औटघटिकेच्याच ठरतो का ? अशा प्रश्न विचारावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली . सांगली जिल्ह्यात जून महिन्याचा  सरासरी एव्हढा पाऊस एका दिवसात झाला . नाशकातही गेल्या कित्येक वर्षाचे उच्चांक मोडणारा पाऊस झाला . त्यामुळे सर्वत्र पावसाचीच चर्चा सुरु झाली . यामुळे  नाशिक जिल्ह्यातील कोरडा काळ  तर वाढणार नाहीना अशी ही  चर्चाही  यामुळे रंगून गेली . जर हा काळ खूप वाढला तर ते पिकांसाठी धोकादायक ठरू शकते .
त्यामुळे या पावसाचा पडण्याचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे . त्यासाठीच हा प्रपंच 
              आपण सर्वसाधारणपणे  पावसाळा हा जून ते सप्टेंबर या कालावधीत समजत असतो तरी . मुख्यतः पाऊस हा फक्त १०० तसेच पडतो . तो सलग ना पडता  काही दिवसांचा फरकाने पडतो , त्यामुळे कदाचित लक्षात येत नाही आपल्या . आता हा काळ कमी होता आहे . कमी काळात पूर्वी पडत होता इतकाच पाऊस पडत असल्याने काही प्रश्न निर्माण झाले आहेत . त्यात मुख्यतः धरणात पाणी  साठवण्याचा प्रश्न निर्माण झाला
आहे . धरणाला कोणताही धोका निर्माण होऊ नये . यासाठी सुरवातीला धरणात काहीसे पाणी आल्यावर धरणाचे दरवाजे उघडे  करण्याचा प्रघात आहे . सध्या कमी कालावधीत प्रचंड पाऊस पडत असल्याने या पारंपरिक पध्द्तीत काही प्रश्न निर्माण झाले आहे . त्याचा प्रमाणे हा बदल पिकांना  हानी पोहोचवणारा न ठरता त्यामध्ये पिकांच्या उत्पादन क्षमतेंत प्रतिकूल बदल ना होता .शेतकऱ्यांना फायदाच कशा प्रकारे होईल आदी प्रश्न यामुळे  निर्माण झाले आहेत . समस्त मानव जाती समोर उभा असणाऱ्या हवामान बदलाचे एक परिमाण म्हणूच याकडे बघायला हवे .  काही दिवसापूर्वी आपण असह्य अशा उकाडा अनुभवाला होता . त्याआधी असह्य थंडीचा पण अनुभवलं घेतला होताच . त्यामुळे अत्यंत विषम हवामान आपल्याला अनुभवायला लागणार हे सध्याचे सत्य आहे . ते आपण सहजपणे स्वीकारून आपण त्याला अनुकूल अशी जीवनशैली आपण  अनुसरयाला हवी .  शास्त्रज्ञांनी सुद्धा अश्या विषम अवस्थेतसुद्धा भरघोस उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या जाती शोधून काढणे  क्रमप्राप्त आहे तरच आपला काही टिकाव लागू शकतो . मागील काही वर्षातील मान्सूनचा कालावधी लक्षात घेतला तरी आपणास हि गोष्ट लक्षात येतेय . म्हणजेच पाऊस बदलतोय हेच खरे .  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?