शह+ आणि मात #

  भारताने जगाला अनेक देणग्या दिल्या आहेत . जसे योगा, आयुर्वेद  , शुन्य, ज्या तत्वज्ञानावर विपश्नना केंद्र चालते असे  बौद्ध तत्वज्ञान ,  आणि बुद्धीबळ ही त्यापैकी काही उदाहरणे . त्यापैकी योगा , आयुर्वेद, बौद्ध तत्वज्ञान अद्वितीय आहेच त्यावर मी पामर नविन काय बोलणार . मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते बुद्धीबळ या खेळाकडे . बुद्धीबळ या खेळाचा उदय जरी भारतात झाला असला , तरी त्याची वृद्धी मात्र रशिया आणि फ्रान्स या देशात झाली . रशियाचा राष्ट्रीय खेळ म्हणून बुद्धीबळ ओळखला जातो .आणि बुद्धीबळाची आंतराष्ट्रीय संघटना म्हणून ओळख असणारी "फेडरेशन आँफ दी इचेस " अर्थात फिडे ही फ्रान्समध्ये उदयास आलेली संघटना आहे , आणि या संघटनेतर्फे सन 1966 पासून दरवर्षी 20 जूलै हा आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो
        जगात सर्वाधिक वैवध्यपुर्ण असणाऱ्या मोजक्या खेळात याचा समावेश होतो .याची सुरवात , मध्य आणि आंतीम सारेच वैवध्यपुर्ण असते . क्रिकेट सारख्या  खेळात कोण जिंकणार याचा अंदाज बांधता येतो (क्रिकेट विश्वचषकाची आंतीम फेरीसारखे अपवाद असतात ) एखादा जिंकत असणारा खेळाडू अचानक त्याची घडाळ्याची वेळ संपल्याने अनपेक्षीतरित्या हारतो . अथवा खेळताना 2 चुकीच्या खेळी झाल्याने जिंकत असणाऱ्या खेळाडुला खेळ सोडावा लागतो .क्रिकेटसारख्या खेळात खेळ संपायला थोडा उशीर झाल्यास
खेळाडुंचा मानधनात कपात होते .संघ हारत नाही . इथे मात्र निर्धारीत वेळेत न खेळल्यास खेळाडू खेळ हारतो , आहे की नाही चित्तथरारक . इतर खेळात प्रेक्षक फक्त लांबून खेळ बघू शकतात . त्या खेळात प्रत्यक्ष भाग घेउ शकत नाही . या खेळाचे मात्र तसे नाही . प्रेक्षक  मुकपणे खेळाडू काय खेळी करु शकेल याचे कारण अखाडे बांधत या मध्ये भाग घेवू शकतो . आहे की नाही जोशपुर्ण कहाणी .
        मी स्वतः महाविद्यलयीन शिक्षणाच्या वेळी काही प्रमाणात स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळलो आहे , ज्याचा मला पुढच्या काळात अत्यंत फायदा झाला , आणि आताही होतोय .तर अशा हा बुद्धीबळ हा खेळ ज्याचा जागतिक दिवस 20 जूलैला साजरा करतात . खऱ्या अथाने पूर्णपणे" मेक इन इंडिया " असणारा हा खेळ .सध्या सर्वत्र  मेक इन इंडीयाची चर्चा सुरु होतीये . त्यामध्ये मग हा खेळ शिकायला सुरवात करा .बुद्धीबळ  शिकवणारे अनेक अँप गुगल प्ले स्टोअरवर आहेत .त्याचा मदतीने आपण हा खेळ सहज शिकू शकतो . तर या वर्षीचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनापासून बुद्धिबळ शिकायला सुरवात करणार ना ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?