लोक दंड भरतीलही, प्राशसनिक जवाबदारीचे काय

केंद्र सरकारने देशातील वाढत्या अपघातांना आळा बसावा म्हणून सुधारीत वाहन कायद्याला मान्यता दिली . या नव्या कायद्यामध्ये सर्वसामान्य प्रवाशांवरवर वाहतूक नियम मोडल्यास जबर दंडाची तरतूद करण्यात आली आहे .या दंडाच्या भितीने सर्वसामान्य जनता वाहतूक नियमांचे पालन करेलही , मात्र प्रश्न उरतोय , प्रशासनाच्या जवाबदारीबाबत काय ?
महामार्गावर अनेकदा रस्त्यावर माती पडलेली असते . घाटाच्या अवघड वळणाच्या ठिकाणी अनेकदा संरक्षण कथडा तूटलेला असतो . चुकीच्या ठिकाणी गतीरोधक असतो .  नाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावर  नाशिक निफाड या 40 किमीच्या रस्त्यावर 39 गतिरोधक आहेत .(महामार्गावर गतिरोधक असू नये असा सरकारी नियम आहे हे विशेष )  आवश्यक त्या ठिकाणी रिफेल्टर्स नसतात . महामार्गावर  अन्य ठिकाणाहून येउन मिळणाऱ्या रस्त्यांवर योग्य त्या खुणा नसणे ( नाशिक पुणे महामार्गावर नाशिक च्या बाजूने येणाऱ्या रस्त्यावर सिन्नर आणि संगमनेर या दोन्ही ठिकाणी मी ही परीस्थिती कित्येकदा बघीतली आहे ) शहराची
गोष्ट तर अजूनच वेगळी , चूकीच्या पद्धतीनने केलेले गतिरोधक , रस्त्यावर दुभाजकांमध्ये लावलेल्या झाडांचा वेडावाकड्या वाढलेल्या फांद्या , रस्त्यावर मधोमध ठाण मांडून बसलेले गाई गुरे, प्रचंड खड्डे पडलेले रस्ते, रस्त्याचा कडेला विविध प्रकारचे पाईप , केबल्स , वहान पार्क करायला जागा नसणे आदी प्रश्न जनतेला सतावत असतात. या कमी कडे सरकार लक्ष देणार आहे का ? जर जनतेला याबाबत  कोणाला दंड करावयाचा झाल्यास जनतेने तो कोणाला करायचा ? आदी प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत .
                    भारतात अपघाताची संख्या आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या प्रचंड आहे , ती कमी होणे ही कळाची गरज आहे , यात तिळमात्र शंका नाही . मात्र ज्या प्रमाणे टाळी एका हाताने वाजत नाही , त्याचप्रमाणे निव्वळ सरकारने सामान्य नागरीकांवर बंधने लादून ही संख्या कमी होणार नाही , त्यादृष्टीने दोन्ही बाजूकडून कृती होणे आवश्यक आहे . मला याची जाणीव आहे की नागरीकांच्या चुकीमुळे होणारे अपघात , आणि प्रशासनाच्या चुकीमुळे होणाऱ्या अपघातात नागरीकांच्या चुकीमुळे होणाऱ्या अपघाताचा वाटा तूलनेने अधिक आहे . तरी प्रशासनाची जवाबदारी दुर करता येणे अशक्यप्राय आहे . जेव्हा नागरीक आणि प्रशासन हातात हात घालून अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करतील , तेव्हाच भारतात अपघाताच्या संख्येत घट होवू शकते . हे लवकरात लवकर व्हावे असी इच्छा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?