डोगंरीच्या तूरुंगातून

           

                     जूलै महीन्याची अखेर जशी जवळ येते , तश्या ज्या गोष्टींची आठवण होते , त्यात लोकमान्य टिळक हे अग्रक्रमी असतात . लोकमान्य टिळकांचे भारतीय स्वातंञ्यलढ्यातील योगदान प्रचंड आहे यात वादच नाही . होमरुल चळवळ चा अपवाद वगळता गांधींसारखे कोणतेही आंदोलन लोकमान्य टिळकांनी केलेले आपणास दिसत नसले तरी त्यांचा लेखणीमुळे अनेकांना स्वातंञ्यलढ्यात प्राणापण करण्याची प्रेरणा मिळाली ज्यात चाफेकर बधुंचा प्रामुख्याने समावेश करता येइल. (या चाफेकरांचा बलीदानातूनच स्वातंञ्यवीर सावरकरांना स्वातंञ्यासाठी प्राणापर्ण करण्याची स्फुर्ती झाली होती ) स्वामी विवेकानंदाना यूनाटेड स्टेट मध्ये जाण्याचा सल्ला आणि  त्यासाठी मदत उभारण्यात सूध्दा लोकमान्याचा वाटा होता. लोकमान्य टिळक आणि  स्वामी विवेकानंद यांचे मुंबई ते पुणे या दरम्यानचे संभाषण प्रसिध्द आहेच. 
                           लोकमान्य आणि  गोपाळ गणेश आगरकर यांचे फारकाळ सख्य झाल्याचे माञ दूर्दैवाने महाराष्ट्र बघू शकला नाही .जर तो प्रसिध्द वाद जर शेवटी ज्या टोकाला गेला ,त्या टोकाला गेला नसता तर महाराष्ट्रात सध्या फार वेगळे चिञ दिसले असते .राजकीय आणि  सामाजीक सुधारणा एकञीत करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचे एक वेगळे चिञ दिसले असते .माञ ईतीहासात जरतर ला फारशे महत्व नसते याची मला जाणीव आहे . माञ समस्त भारताला त्यातही महाराष्ट्राला दूहीची मोठी दूर्दैवी परंपरा असल्याने( ज्यात ताराबाई भोसले आणी शाहू भोसले हे छञपती शिवाजींचे वंशज आणी पेशव्याचा बाबतीत बोलायचे झाल्यास राघोबादादा पेशवे नारायण राव पेशवे तसेच राघोबादादा पेशवे आणी सदाशिवराव पेशवे (पहीले इंग्रज मराठा युध्द वसईचा तह) ही प्रातनिधीक म्हणून घेण्यास हरकत नसणारी उदाहरणे आहेत भारताचा बाबतीत बोलायचे झाल्यास ब्राम्हो समाजाचे उदाहरण घेता येइल)त्या परंपरेला जागत दोघांत वितूष्ट आले संत साहीत्याचे गाढे अभ्यासक संत तुकारामांचे वंशज आणि  घूमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांनी लोकमान्य टिळकांच्या पश्च्यात जे गांधीयुग आले त्या विषयी लोकमान्य ते महात्मा हा ग्रंथ लिहला आहे माञ माझ्या माहीतीतरी या महत्वाचा दुहीवर कोणी फारशे भाष्य केल्याचे माहीती नाही जर कोणाला माहीती असल्यास क्रुपया सांगावे ते मुद्रीत पुस्तकापेक्षा ई पूस्तक असल्यास अजूनच उत्तम 
            लोकमान्य टिळकांचा सामाजिक सुधारणा आमचा आम्ही करू तुम्ही फक्त राजकीय स्वातंञ्य द्या अशा आग्रह मला
वैयक्तीक रीत्या त्यांचा परी सर्वतोपरी आदर व्यक्त करत आज त्यांची जयंती असली तरी पटलेला नाही स्वातंञ्यानंतर झालेल्या सामाजीक सुधारणा आणि  ब्रिटीशकाळात झालेल्या समाज सूधारणा यांची तूलना केल्यास माझ्या मते पारतंञ्य काळातील सुधारणा अधिक होत्या अर्थात ही माझी मते आहेत तुमची मते भिन्न असू शकतात आणि तुमच्या मताचे मी स्वागतच करतो महाराष्ट्रातील एक महत्वाचा वैचारीक संघर्ष असे मी त्याचे वर्णन करेल लोकमान्य टिळकांचा काळातच झालेला मुस्लीम लीगचा उदय राष्ट्रीय सभेचे तुकडे यांनी भारताचा स्वातंञ्य चळवळीत मोठी भुमिका बजावली यात शंकाच नाही लोकमान्यांनी सणांच्या समाजाला एकञीत करण्याचे मोठे कार्य केले ते अव्दितीयच आहे यात शंकाच नाही
         त्यांनी बलोपासनेला दिलेले महत्वही विसरुन चालणार नाही लोकमान्य टिळकांनी पुणे परीसरात सुरु केलेले औद्योगिकीकरण ही मह्तवाचे आहे या विषयी खुप काही लिहता येवू शकते माञ तुर्तास थांबतो पून्हा भेटण्यासाठी तो पर्यत नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?