डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आम्हाला माफ करा .

तिर्थस्वरुप 
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना साष्टांग नमस्कार 
डॉक्टर आम्हाला माफ करा . येत्या 20  आॉगस्टला तुमच्या जाण्याला तब्बल 6 वर्षे होतील . माञ न्यायालयात खटला उभा राहणे तर दुरच आम्ही तुमच्या मारेकऱ्यांना  पण पकडु शकलो नाही . नाहि म्हणायला आम्ही काही संशयीतांची चौकशी केली . तुमच्या तत्वात न बसणारा प्लँचेट आदी प्रकार करून तुमच्या मारेकऱ्याला  शोधण्याचा प्रयत्न केला .पण उपयोग शुन्य झाला. त्या बद्दल आम्हाला माफ करा . .हिंदुत्वाचा कैवार असलेले लोक आता सत्तेत आहेत . माञ प्रखर हिदुत्ववादी असणार्या स्वातंञ्यवीर सावरकरांचा विज्ञानवादी दृष्टिकोनाचा  त्यांना विसर पडलेला दिसतोय . ज्या कायद्यासाठी तुम्ही प्राणापर्ण केले तो कायदा सत्तेत आल्यावर रद्द करू म्हणणारे सध्या सत्तेत आहेत .माञ ते ही गोष्ट विसरलेत बहुदा . आणि  जे योग्यच आहे ना ?काही दिवसापूर्वी  कोल्हापुरच्या गोविंद पानसरे यांच्या हत्यारापर्यत सरकार पोहचलेय असी बातमी वाचली .  तेव्हा मनात विचार आला तूमच्या बाबतीत ही बातमी कधी वाचायला मिळेल जेव्हा मिळेल तो सुदिन असेल खरच .. सांगायचा मुद्दा असा की जरी तुमचा हत्येचे मारेकरी पकडले तरी त्याना शिक्षा होण्यासाठी किती कालावधी लागेल . महात्मा फुल्यांचा निर्मीकासच ठाउक असेल कदाचित? 
        आमच्या नाशकात माञ तुमच्या नावे व्याखानमाला सुरु झालीये . इतरही शहरात सुरु झाल्या असतील तूमच्या नावे व्याखानमाला . याचा उपयोग किती होतो हे येणारा काळच ठरवेल . तुम्ही जो कायदा तयार केला तो खुप चांगलाच आहे यात
शंकाच नाही नुकतीच त्या कायद्यातर्गत काही  शिक्षाही झाल्या . तुम्ही जिथे कुठे असाल तिथे हे बघून तुम्हाला आनंदच झाला असणार . आपल्या राज्यघटनेत 51 अ या कलमातंर्गत वैज्ञानिक दृष्टिकोन  बाळगणे नागरीकाचे मुलभुत कर्तव्य आहे माञ त्याचे पालनच केले जात नाही . परीणामी तुमच्या सारख्यांचा प्राण जातो हे दुर्दैवाचेच आहे ना ? त्या घटनेनंतर शनवार पेठेतील ओंकारेश्वर पुलावरुन मी कित्येकदा प्रवास केला आहे दरवेळेस मला तुमची आठवण आल्या शिवाय रहात नाही .                                   स्वातंञ्यवीर सावरकरांचा हिदुत्वाविषयी भरभरून बोलणारे लोक त्यांचा विज्ञाननिष्टेविषयी फारसे बोलताना मला तरी दिसले नाही (माझे अनुभव विश्व फारच तोकडे आहे याची मला जाणीव आहे माञ जे काही अनुभव विश्व आहे त्याचा आधारे मी हे लिहले आहे) असो,  ब्रिटीश भारतात येण्यापुर्वी जागतीक व्यापारात असणारा भारताचा 23टक्के असणारा वाटा ब्रिटीश आल्यावर कमी झाला.  याला मी ब्रिटीश येण्यापेक्षा आपले विज्ञानाकडील दुर्लक्ष मानतो ब्रिटीश वैज्ञानिकदृष्टया  प्रगत असल्याने हे झाले असे मला वाटते . तरी पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने शहाणे का होत नाहीये ? त्यासाठी तुमच्या सारख्या अजून किती जणांना प्राणांना मुकावे लागणार ? डॉक्टर जाता जाता येव्हढच सांगतो मी अजिंक्य तरटे तरी काही झाले तरी तुमच्या विवेकाच्या मार्गावरून दुर जाणार नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?