कला शाखेचा अंत ?


 सध्या भारतासमोरचा सर्वात मोठा यक्षप्रश्न म्हणून बेरोजगारीकडे  समाजशास्त्रज्ञ  बघत आहेत . त्यावर सरकारही नवे उद्योग उभारण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे . मात्र या कारखन्यांमध्ये काम कोण करणार ? सर्व जण त्या कारखन्यात काम करु शकतील का ? याकडे कोणीही लक्ष देत नाहीये . मला तूम्हाला लक्ष वेधून घायचे आहे ते त्याकडेज्यांना यांत्रिकीची जाण आहे अश्या व्यक्ती कारखान्यात कामगार म्हणून काम करतील . ज्यांना हिशेबाचे ज्ञान आहे अश्या व्यक्ती वाणिज्य शाखेतील कामकाज सांभाळतील मात्र प्रश्न उरतो तो कला शाखेतील विद्यार्थ्यांचा . त्यांच्याकडे यापैकी  कोणतेच कौशल्य नसणार . मग अशा बेरोजगार   तरुणाईने काय करायचे ? सध्या कोणीच त्यांच्या प्रश्नाकडे  बघत नाहीये . माझ्या माहितीप्रमाणे अश्या कात्रीत सापडलेल्या तरुणाईची संख्या प्रचंड आहे
               नाही म्हणायला "मानसशास्त्र" सारख्या  हाताच्या बोटावर मोजता यातील असे काही कला शाखेतील विषयांना पुढच्या काळात प्रचंड संधी असणार आहेत . मात्र मराठी , हिंदी , सारख्या
विषयाच्या विद्यार्थ्यांनी  करायचे काय ?           
           स्पर्धा परीक्षेचे म्हणाल तर सध्या त्या मध्ये होणारे बदल कला शाखेसाठी स्वागतार्ह्य  नाहीये . काठिण्य पातळीवर सामानता  आणण्याचा हेतूने  त्यातील लेखी भाग विविध संस्थांकडून कमी होत आहे . आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सोयीचा ठरेल अश्या प्रकारचे रिझनींग(मराठी प्रतिशब्द  सुचवा ) सारख्या  विषयांचा कल  वाढतोय .  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा पूर्वी डॉक्टर आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना देता येत नसे . आता या घडाळ्याचे काटे परत मागे आणणे निव्वळ अशक्यप्राय आहे . मग कला शाखेतील विद्यार्थ्यांनी काय करायचे ? 
काही जण त्यांना सॉफ्ट स्किल शिकण्याचा सल्ला देतील .मात्र त्यांना मला विचारायचे आहे . मराठी इतिहास सारख्या विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी लोमटे सॉफ्ट स्किल शिकणार ? वाणिज्य शाखेचे सॉफ्ट स्किल शिकून लेखा विभागात काम करणार की ? मशीनवर काम करण्यास उपयुक्त ठरणारे सॉफ्ट स्किल शिकून कामगार होणार .? माझ्या माहितीनुसार याबाबत कोणतीही भूमिका कोणाकडूनही स्पष्ट करण्यात आलेली नाही . त्यामुळे या शाखेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे हे नक्की ? 
जर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीच उपलब्ध होणार नसतील तर कोण  जाईल कला शाखेत शिकायला ? त्यामुळे हि विद्याशाखाच बंद होऊ शकते ती होऊ नये अशी सदिच्छा करून सध्यापुरते थांबतो , पुन्हा येण्यासाठी नमस्कार 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?