उद्या नंतरचा दिवस नव्हे , आजचा

        इंग्रजीतील  एक अत्यंत  उत्कृष्ट  चित्रपट म्हणजे   " Day  After  Tomorrow"  अर्थात उद्यानंतरचा दिवस . हवामान बदलाविषयी महत्तवाची  माहिती  शास्त्रीय  पद्धतीने  मात्र तरीही रंजकतेने  देणारा हा चित्रपट .मात्र हा  उद्यानंतरचा दिवस  आजच उजाडल्यासारखी  स्थिती  सध्याचा हवामानाकडे  बघून वाटण्यासारखी  स्थिती सध्या निर्माण झालीयें .     
   युरोपात प्रचंड उष्णतेची लाट आली आहे . आपल्या भारतात बहुसंख्य ठिकाणी अत्यल्प पाउस पडलाय . ज्या ठिकाणी तो पडलाय , त्या ठिकाणी अक्षरशः त्याने नकोसे केले आहे .आसाम आणि बिहारमध्ये प्रचंड पूर आले आहेत . काही दिवसापुर्वीचे  दिवस आठवा कडाक्याची थंडी पडल्याचे आणि त्यानंतर असह्य उन्हाचे दिवस तूम्हाला आठवेल . आणि आताचा पावसाचा लहरीपणा . सारेच बदल या चित्रपटाची आठवण करुन देणारे .सन 2004 साली आलेला हा चित्रपट आज सन 2019 सुरु आहे .पंधरा वर्षात त्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्या वेळी सुरु असणारा दिवस (त्या वेळचे हवामान ) संपतो, त्या नंतरचा दिवस
देखील संपतो आज सुरु होतो "Day After Tomorrow 'म्हणजेच सध्याचे हवामान               चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अजून कोणत्या समुद्रप्रवाहाने आपले रंग दाखवले नाहीये हे आपले नशिब, मात्र चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एका दिवसात हवामान बदलले तर ओम स्वाहा म्हणण्याखेरीज दुसरी वेळ नसेल .     जर भारतीय पुराणकथांचा आधार घेउन किंवा बायबलचा आधार घेऊन   यावेळी समस्त मानवजातीला वाचवायला कोणता मासा अथवा भगवान भोलेनाथ आणि निओ  येतो  हे बघणे आणि हातावर हात ठेवणे शहाणपणाचे ठरणार नाही आपल्यालाच या भुमिका बजावाव्या लागणार आहेतआखाती देशातील राजकीय अस्थिरता , तेथील दहशतवाद आदी समस्येसे जगातील डहुतेक समस्येचे मुळ असलेल्या अमेरीकेला आणि तेथील राजकरण्यांना याबाबत योग्य कार्य करण्याची सुबुद्धी येवो अशी सदिच्छा व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो , ते पुन्हा भेटण्यासाठी


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?