राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धा , एक दुर्लक्षीत स्पर्धा

                       सध्या भारतात सर्वत्र इंग्लडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट या मुळातील भारतीयांचा नसणाऱ्या खेळाच्या विश्वचषकाची चर्चा मोठ्या जोमात सुरु आहे . इंग्लडची एकोणविसाव्या आणि विसाव्या शतकात सत्ता असणाऱ्या 71 देशांपैकी हाताचा बोटावर मोजता येईल इतक्या देशात खेळला जाणारा हा खेळ . इंग्लडचा संपुर्ण वसाहतीतसुद्धा जो खेळ खेळला जात नाही असा हा खेळ .  भारतात राष्ट्रीय धर्म बघीतला जातो .
                   मात्र या सर्व रणधुमाळीत  भारतात नुकत्याच  ज्या खेळाच्या  राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या तो बुद्धीबळ  हा खेळ मात्र दुर्लक्षीला गेला .तर सांगायचा मुद्दा असा की नुकत्याच 30 जून ते 7 जूलै दरम्यान बुद्धीबळाच्या राष्ट्रकुल संघटनेचा स्पर्धा दिल्लीत संपन्न झाल्या .मात्र या स्पर्धेला माध्यमांमध्ये तूरळक प्रसिद्धी मिळाली . अर्थात हे होणे स्वाभाविकच होते .
                         कारण या खेळात उत्सुकता असली तरी ती समजण्यासाठी तो खेळ किमान पातळीवर यावा लागतो  क्रिकेट सारखा कधीही बँट हातात  न  धरलेला व्यक्ती सुद्धा ज्या प्रकारे याचा आनंद घेवू शकतो . तो प्रकार बुद्धिबळाबाबत करता येत नाही . तसेच हा खेळ बघताना शांतता पाळावी लागते . अन्य खेळासारखी हुल्लड बाजी येथे चालत नाही . परीणामी हा खेळ फारसा लोकप्रिय नाहीये .आणि सध्याचा तत्वविरहीत अर्थकारणाभोवती फिरणाऱ्या माध्यमांमध्ये यामध्ये कोण लक्ष देणार ?या बुद्धिबळ राष्टकुल स्पर्धेमध्ये भारत, दक्षीण आफ्रिका, आदी विविध देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये  नाशिकहून ४ खेळाडू विविध वयोगटातील स्पर्धेत सहभागी झाली होते . मात्र असे असून देखील नाशिकच्या मान्यवर वृत्तपत्रांनी याची म्हणावे अशी यथोचित्र दखल घेतली  नाही असे खेदाने नमूद करावे लागते आहे . हातात हे खेळाडू जेव्हा जगात भारताचा डंका वाजवतील तेव्हाच  उपरूक्ती होऊन नाशिकची वर्तमानपत्रे दाखल घेतील बहुतेक . पिकते तिथे विकत नाही हेच खरे
मी स्वतः अल्प प्रमाणात का होईना स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळलो आहे . या अल्प खेळाचा सुद्धा  मला माझ्या अभ्यासात प्रचंड फायदा होत असतो . बुद्धिबळामुळे निर्णय क्षमतेचा खूपच चांगल्या प्रकारे विकास होतो .
सध्या महाराष्ट्र्रात आणि भारतात सुद्धा बुद्धिबळाच्या चांगल्या  स्पर्धा होत आहे  गरज आहे त्यांना अधिकाधिक प्रसिद्धी देण्याची . ते कामे माध्यमे चांगल्या पध्द्तीने या पुढील काळात करतील अशी आशा व्यक्त करून  आतापुरती  रजा घेतो . भेटूया पुढच्या वेळी तो पर्यंत राम राम
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?