टोल नाका जीव वाचण्याचे साधन

नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल मधून लवकर सुटका  नसल्याचे एका ठिकाणी सांगितले आणि विविध चर्चेला उधाण आले . आपण आपले वाहन रस्त्यावर आणताना विविध कर भरतोच .  मग हा टोलचा भुर्दंड कशासाठी ?   आदी प्रतिक्रिमा  यावर विविध माध्यमातून उमटू लागल्या . मात्र सध्याच्या वाढलेल्या अपघाताच्या पाश्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी  आपणास टोल नाक्याचे महत्व दूर्लक्षून चालणार नाही , या टोल  नाक्याच्या सुयोग्य वापर केल्यास स्पीड गन सारख्या खर्चिक  उपाय ना योजता अपघाताला बऱ्याच मोठ्या प्रमाणांत आळा घालता येऊ शकतो . 
            आपणास दोन टोल नाक्यातील अंतर माहिती असतेच ते अंतर सूरक्षीत पणे पार करण्यासाठी किती वेळ लागेल हेही आपण सांगू शकतो . समजा तो कालावधी य आहे आता आपल्याला एकच करायचे .ते म्हणजे एका टोलनाक्यावरुन दूसऱ्या  टोरलनाक्यावर जाण्यासाठी क्ष रुपये टोल  असेल तर य कालावधीत पोहचणाऱ्या  वाहनांना टोल मधून काही प्रमाणात सवलत द्यायची तर य कालावधी पेक्षा कमी काळात हे

अंतर पार करण्याऱ्या  वाहनांना क्ष या रक्कमेच्या चार ते पाच पट टोल भरायला लावल्यास लोक आपसूकच हळू चालवतील.  कारण प्रत्येकाला आपला पैसा कमीत कमी खर्च व्हावा तो आपल्याकडेच राहावा असे वाटत असते . त्यामुळे लोक स्वतःहून गाड्या हळू चालवतील . टोलच्या पावतीवर वेळ असतेच त्यामुळे हे काम सहज सोपे आहे असे मला वाटते
काही  अशाही मुद्दा मांडतील की  काही लोक भरधाव वेगाने गाड्या चालवतील आणि मधल्या फूड स्टॉल वॉर अधिक वेळ घालवतील  अश्या लोकांना माझे सांगणे आहे   की फूड स्टॉलवर गाड्यांच्या क्रमांकाची नोंद ठेवल्यास आणि त्याची टोल नाक्यावरील यंत्रणेशी सांगड घातल्यास त्यांनी फूड स्टॉलवर घालवलेला वेळ एकूण वेळेतून कमी करणे सहज शक्य आहे . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?