सामाजिक वनीकरणात दुर्लक्षीलेले जाणारे मुद्दे आणि पर्यावरणीय हानी

           सध्या अनेक ठिकाणी सामाजिकरित्या  वनीकरण केले जात आहे . समाजाच्या वनीकरणातील  सहभाग कौतुकास्पद असला , तरी या सामाजिक वनीकरणात काही मुद्दे अज्ञानामुळे दुर्लक्षले जात आहे ,  ज्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे . त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असा परिणाम होत आहे . त्यामुळे हे टाळणे अत्यावश्यक आहे . हे टाळण्यासाठीचा पहिला प्रयत्न म्हणजे असे मुद्दे समजून घेणे जे यामध्ये अंतर्भूत आहेत .
       यातील पहिला मुद्दा म्हणजे सामाजिक  वनीकरणात वापरली जाणारी वृक्षे . सामाजिक वनीकरणात प्रामुख्याने लवकर वाढणारी झाडे लावली जातात . ज्यामध्ये अनेकदा निलगिरी सारख्या परदेशी वृक्षाची निवड केली जाते . जे चुकीचे आहे . या परदेशी झाडांवर पक्षी बसत नाहीत . त्यामुळे पक्ष्यांना या झाडांचा काहीही 
उपयोग होत आंही . मात्र त्यांच्या नैसर्गिक अधिवास मात्र नष्ट झाला असतो .त्यामुळे पक्ष्यांची संख्या मात्र कमी होते . जे पर्यावरणाला हानी पोहचवणारे असते .  तसेच या झाडांमुळे जमिनीचा पोत देखील बदलतो  . आपण वड ,पिपंळ , आंबा , साग शिसव अशी भारतीय झाडे लावू शकतो . या विषयी अधिक माहिती आपण कोणत्याही पर्यावरण तज्ज्ञाला विचारू शकतो
दुसरा मुद्दा म्हणजे या प्रकारच्या सामाजिक वनीकरणातून लावण्यात येणारी एकसारखी एकाच प्रकारची झाडे . आपण कोणत्याही नैसर्गिक जंगलात गेलो असता आपणास सहजपणे दिसते कि नैसर्गिक जंगलात विविध प्रकारची झाडे असतात . मात्र सध्या कोणत्याही तज्ज्ञ व्यक्तीशिवाय सरसकट करण्यात येणाऱ्या वृक्षारोपपणात याचे भान न ठेवता सरसकट एकाच प्रकारची झाडे लावली जातात . शासकीय वृक्षारोपणनात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसतो .
हे घटक सोडले तर समामाजीक ही अत्यंत उपयोगीसमाज उपयोगी चळवळ आहे . पर्यावरणीय तज्ज्ञांच्या मते एखाद्या भूभागाच्या  ३३ % प्रदेशावर वने असले त्या प्रदेशाच्या नैसर्गिक संतुलनासाठी आवश्यक आहे . भारतात हे प्रमाण फक्त २१. ४ % आहे त्यामुळे ते वाढणे ही काळाची गरज आहे . त्याला सामाजिक वनीकरण मोठ्या प्रमाणात मदत करते . याबाबत शंका घेण्यास वावच नाही . अजून निम्मा पावसाळा दूर व्हायचा आहे . त्यामध्ये वॉर सांगितलेले धोके टाळून वनीकरण झाले तर सोने पार सुहाना होईल यात शंका नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?