गीतमहाभारत आणि मी

      साधरणत: पंधरा दिवसापुर्वीची गोष्ट आहे ही.  एका मुंजी निमित्य आयोजित कौटंबिक कार्यक्रमात गीतरामायण ऐकण्याचा आनंद लुटता आला.  माञ गायक गीतरामायण सादर करत असताना विचार आला जर गीतरामायण होवू शकते तर गीत महाभारत का नाही ?      
                 महाभारत सुध्दा उत्तम काव्य आहे  नंतर  सावकाश विचार करताना जाणवले की  रामायण च्या तुलनेत महाभारत अधिक व्यापक काव्य आहे रामायण एकव्यक्ती आधारीत  काव्य आहे
                  महाभारतात मला तरी एकच नायक आढळत नाही  कौरव पांडव जरी मुख्य असले तरी त्याचावरच कथा फिरते असे नाही श्रीक्रूष्ण असो वा अगदी मागे जायचे म्हटले तर देवयानी शर्मिष्ठा ययाती पितामह भिष्म हे सुध्दा कथेचे नायक वाटू शकतात महाभारतातील शांतीपर्वातील परीक्षित राजाची गोष्ट असो किंवा कुंती द्रोपदी पण नायक बनु शकते त्यामुळे महाभारत एका गीतमालेत येणे आवघड आहे असे मला जाणवले अर्थात हे माझे निरीक्षण आहे अर्थात माझे निरिक्षण परिपुर्ण आहे अशा माझा दावा नाही माझा निष्कर्ष चुकीचा पण असू शकतो
                            रामायणा बाबत बोलायचे झाल्यास सर्व कथा राम रावण आणि सीता यावरच फिरते .सीता स्वयंवरात होणारा रावणाचा अपमान त्यामुळे त्याला होणारा राग त्यात शुर्पणखा चे नाक कापले जाणे सर्व गोष्ट ठराविक व्यक्ति भोवतीच फिरते त्यामुळे  असेल कदाचित गीत रामायणची निर्मिती होते पण गीत महाभारणाची निर्मिती होत नाही
             
मला गीतरामायणातील "माता नं  तू वैरीणी" हे गाणे विशेष आवडते तशी सर्व गीतरामायणे तील गीते  आवडतात म्हणून विशेष आवडतात हा उल्लेख तसेच "इतूके बोलले मज श्रीराम" हे गाणे पण मला आवडते गीत रामायणाची काव्यात्मकता ही अवर्णीय गोडवा असणारी आहे यात वादच नाही बाबुजींनी तेव्हढेच गोड गावून  सोने पे सुहाना   या म्हणीचा प्रत्यय दिला आहे या त तिळमाञ शंका नाही  या विषयी खूप काही बोलण्या सारखे आहे पण सध्या इथेच थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत बाय टेक केअर

          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?