एक नजर त्यांचा कामाकडे

            मी दिनांक 4 जुलै 2019 ला मी आर्टिकल्स १५ हा चित्रपट  चिञपट नाशिक येथील सिनेमँक्स या चिञपटग्रुहात बघीतला चिञपट उत्तम आहे मी या उप्पर अधिक सांगणार नाही मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते चिञपट संपल्यावर जी श्रेयावली येते तीचाकडे 
          माझे असे निरीक्षण आहे की बहूसंख्य जण चिञपट संपल्यावर येणार्या श्रेयावलीकडे साफ दूर्लक्ष करतात चिञपट तयार करणे हे सांघीक कार्य आहे आपल्यास पडद्यावर जितके लोक दिसतात त्याचा तुलनेत अधिक लोक पडद्यामागे कार्यरत असतात त्याचा कामाची दखल घेण्यासाठी चिञपटाची सांगता झाल्यावर दाखवण्यात येणारी श्रेयावली किमानपक्षी डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे असे माझे प्रामाणीक मत आहे 
                 त्यातील काही जणांना विविध पुरस्कार देवून जरी गौरविण्यात येत असले तरी ती काहीसी उशीरा घेतलेली दखल असते त्यांची योग्यवेळी दखव घेण्याचा मार्ग म्हणजे चिञपट रसिकाने ती श्रेयावली किमानपक्षी डोळ्याखालून घालणे हा होय आणी आपल्याला पडद्यावर दिसणार्या व्यक्तीची आपणास सहजतेने ओळख होते माञ हे भाग्य दूर्दैवाने पडद्यामागील व्यक्तीना मिळत नाही बहूसंख्य वेळेस त्यांची ओळख आपणास पुरस्करादरम्यानच होते आणि  या पडद्यामागील प्रत्येक कलावंतास पुरस्कार मिळतोच असा नाही सबब प्रत्येक चिञपटाचा या पडद्यामागील कलावंताची ओळख होतेच असही नाही                       
    चिञपट तयार करण्यात या व्यक्तीचा सहभाग मोठ्या प्रमाणात असूनही पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या प्रतीभेतून साकारलेल्या हरीतात्या या व्यक्तीचा स्वाभाववैशिष्ठाप्रमाणे यांचे चिञपट निर्मितीतील योगदान पुराव्यानी साबीत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चिञपटाचा अखेरीस येणारी ती श्रेयावली होय तरी आपण ती श्रेयावली बघायलाच हवी मी स्वत:हा ती बघतो आणी हे फक्त या बाबतीतच होते असे नाही कितीतरी ठिकाणी ही पडद्यामागील व्यक्ती पडद्यामागेच राहतात त्याचे योगदान आपण विसरायला नको मी एका व्रुतपञाच्या रविवार च्या विशेष पुरवणीत  चिञपटस्रुष्टीतील अश्या कलावंताच्या प्रश्नांविषयी लिहून आले होते ते वगळता त्यांचा प्रश्नाविषयी फारशा आवाज उठवलेला मला तरी दिसलेला नाही 
                                  या वर्गाविषयी आपण किमानपक्षी त्याची नावे डोळ्याखालून घालून सहानभुती व्यक्त करू शकतो बहुसंख्य प्रसंगी जे पडद्यावर दिसतात अश्या व्यक्तीकडून या वर्गाबाबत फारशा आदर्श द्रुष्टीकोन ठेवला जात नाही जे अयोग्य आहे असो माञ सध्या या मतप्रवाहात बदल होत आहे जी गोष्ट स्वागतार्ह आहे या विषयी खुप काही लिहण्यासारखे आहे पण तुर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत राम राम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?