स्मरण ऐतहासिक समुद्र उडीचे

                              स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे  ऐकताच मन आदराने अणि आनंदाने  भरून न येणारा खचितच एखादा मराठी माणूस असावा.   सावरकरांचे संपूर्ण आयुष्यच धगधगते अग्निकुंड होते असे  म्हंटल्यास ठरू नये . त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी त्यांना युनाटेड किंग्डम या देशातून भारतात आणताना फ्रांसच्या किनाऱ्यावर मारलेली उडी . 2019 या वर्षी या ऐतिहासिक उडीला 109 पूर्ण होत आहेत . याच उडीमुळे त्यांच्यावर हेगच्या आंतराष्ट्रीय न्यायालयात खटला चालला . मुक्ततेसाठी त्यांनी केलेला हा प्रयोग जरी दुर्दैवाने फसला असला तरी त्याचे मोल विसरता येण्यासारखे नाही . जर हा प्रयोग यशस्वी झाला असता तर भारताला स्वातंत्र्य बऱ्याच आधी मिळाले असत कदाचित  देशाची फाळणी सुद्धा रोखली गेली असती.  मात्र आपल्या दुर्दैवाने हे घडले नाही.  ऑनी बेझंट  या सावरकरांना मदत देण्यात काही कारणाने कमी पडल्या  आणि सावरकर ब्रिटिशांचा कैदेत पकडले गेले . आणि त्यांना 2 जन्मठेपेची 50  वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
                           जगाच्या इतिहासात   एक महत्वाची घटना म्हणून याकडे बघितले जाते . स्वातंत्रवीर सावरकर यांनी  युनाटेड किंग्डम मध्ये वकिलीचे शिक्षण घेत असताना भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी केलेल्या प्रयत्नात त्यांना अटक होते . त्यानंतर त्या खटल्यासाठी त्यांना भारतात आणले जात असताना फ्रान्सच्या किनाऱ्यावर त्यांनी  उडी मारली , पुढचा इतिहास सर्वश्रुत आहेच .   भारताच्या महत्वाच्या क्रान्तिकारकांमध्ये त्यांचा समावेश होतो तो यामुळे
         1896 साली पुण्यामध्ये जुलमी ब्रिटिश जिल्हाधिकारी रॅंडच्या हत्येसाठी चाफेकर बंधूना फाशी दिलेले पाहून पेटलेला हा तरुण पुढचे सर्व आयुष्यभर मातृभूमीसाठी झुंझत राहिला . अगदी शेवटच्या श्वासापर्यंत .
याच उडीच्या  सामानार्थ  नाशिकच्या पहिल्या जलतरण तलावाचे नामकरण सुद्धा त्यांचा नावावरून करण्यात आले आहे सावरकर एका ब्लॉग पोस्टाचा विषय नाहीच  त्याचे कर्तृत्व खूप मोठे होते . ते शब्दबद्ध जाणायचे सामर्थ्य माझ्याकडे  नाहीच . तरी पुन्हा एकदा त्या जगप्रसिध्द् उडीला स्मरून  आजपुरते थांबतो .




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?