काही अनुत्तरीत प्रश्न

                काही महिन्यांपुर्वी ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज आणि  भारतीय पोलिस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी  हिमांशू राँय यांनी आत्महत्या केली,  आणि 29 जूलै2019 रोजी  काँफी पार्लर ची भारतातील  सर्वात मोठी साखळी चालवणाऱ्या व्ही जी सिद्धार्थ यांनी आत्महत्या केली . लौकिक अर्थाने ही माणसे खुप यशस्वी  होती . अनेकांचे आदर्श होती . तरी त्यांच्या जीवनाची अखेर दुर्देवी होती . भय्युजी महाराज यांनी कौंटुबिक कारणांनी, हिमांशू राँय यांनी   शाररीक अक्षमतेमुळे ,तर हि जी सिद्धार्थ यांनी आर्थिक विवंचनेतून मृत्यूला कवटाळले .
                                      थ्री इडियट हा चित्रपट हा जेव्हा प्रदर्शीत झाला , तेव्हाचा काळ आठवा ,  विद्यार्थ्यांनी आत्महत्येद्वारे  जीवन संपवल्याचा बातमीने त्यावेळेची वर्तमान भरलेली असायची .शेतकऱ्यांच्या आत्महत्या जेव्हढ्या  महत्तवाचा आहेत . तेवढ्याच महत्तवाचा या आत्महत्या आहेत . मात्र या प्रश्नाकडे आपले सरकार पाहिजे त्या प्रमाणात लक्ष का देत नाहीये . फक्त थातूर मातूर उपाययोजना का केल्या जातात . या प्रश्नाकडे आत्महत्या करणाऱ्याचा वैयक्तिक प्रश्न म्हणून न बघता सामाजिक प्रश्न म्हणूं बघावयास हवा . माणसाला कोणतीही गोष्ट चिरकाळ टिकणारी नसते .याची जाणीव करून देणे अत्यावश्यक आहे . आपल्या शिक्षणात याचा दुर्दैवाने अभाव आहे . जो दूर होणे अत्यावश्यक आहे .
             आपल्याकडेसमुपदेशकाची संख्या अत्यंत तोकडी आहे . त्यात वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे .  सध्या
विभक्त कुटुंब पध्द्ती आहे . ज्यामध्ये माणसाची भावनिक गरज भागवली जात नाही . परिणामी वाढती स्पर्धा आणि भावनिक कुपोषण यामुळे माणसे आत्महत्येसारखा मार्ग अवलंबतात . ज्या प्रमाणे दहावी आणि बारावी परीक्षेदरम्यान समुपदेशक असतात . त्याच प्रमाणे व्यावसाईक स्पर्धेमुळे येणाऱ्या ताण  तणावाचा निचरा होण्यासाठी समुपदेश असणे अत्यावश्यक आहे . तरच  अस्या आत्महत्या थांबतील . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?