जब हमने दुनिया मांगी काटोंका हार मिला

     चित्रपट हे समाजाचे मनोरंजन करतानाच प्रबोधनाचे उत्कृष्ट माध्यम आहे याची   जाण भारतातल्या अत्यंत मोजक्या सिने निर्मात्यांना आहे , असे अत्यंत  खेदाने खेदाने म्हणावे लागते लागते . या    मोजक्या सिने निर्मात्यांमध्ये गुरुदत्त यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल . 9 जुलै हा  त्यांचा जन्मदिवस त्याप्रत्यर्थ त्यांना विन्रम आदरांजली .
          गुरुदत्त यांनी भारतीय सिनेश्रुष्टिला  वेगळयाच उंचीवर नेऊन पोहचवले त्यांनी आधुनिक  तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या सिने निर्मितीत केला . त्यासाठी त्यांनी पाश्चात्य देशांचे दौरे देखील केले . मानवी  आयुष्यातील  दुःखांना रुपेरी पडद्यावर चित्रित करणे आणि त्यातून समाजाचे प्रबोधन करत मनोरंजन करणे यात त्यांचा  कोणी धरू शकणार नाही . दुर्दैवाने त्यांचे अकाली वयाच्या ३९  व्या वर्षी  निधन झाले त्यांचा 20 वर्षाच्या सिने कारकीर्दीतील   शेवटची 10 वर्षे
अत्यंत  मह्त्तवाची आहेत . त्याचा विवाह,  त्यांचे असफल  प्रेमप्रकरण  आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू   सारे  काही त्या दहा वर्षात घडले . सिने श्रुष्टीतील क्षणाभराची प्रसिद्धी  कथन करणारा कागज के फुल हा चित्रपट अजो भी सो किंवा एका प्रतिभावंत मात्र जगाने धिक्कारलेला कवीच्या माध्यमातून हे जग पैशाला किती महत्व देतो .पैशापुढे मानवी नाती कशी थिटे पडतात . याचे हृदयस्पर्शी चित्रण करणारा टाइम्स च्या नुसार 20 व्या शतकातील सर्वोत्त्कृष्ट चित्रपटात मनाचे स्थान मिळवणारा प्यासा असो . अथवा , मुंबईच्या धर्तीवर चित्रित  झालेला चित्रपट सी  आय डी असो  त्यांचे  सर्वच चित्रपट एकाहून एक सरस होते . त्यांचा चित्रपटांतील गाणी सुद्धा खूपच छान असत . चौदहवी का चाँद हो   आफताब हो जो भी तुम खुदाकी कसम लाजवाब हो , ये  मुंबई है मेरी जान , सर जो जो तेरा चकराई चकराई तेल मालिश यासारखी  प्रसिद्ध असणारी गाणी त्यांचाच चित्रपटातील .
            आचार्य  अत्रे यांच्या शब्दात सांगायचे गेल्यादहा हजार वर्षात अशा सिने निर्माता झाला नाही , पुढे दहा हजार  सिने निर्माता होणे नाही . मला तर राहून राहून असे वाटते की त्यांचे अकाली  निधन झाले नसते तर भारतातला एखाद दुसरे ऑस्कर  मिळाले असते . अर्थात जर तर ला किती अर्थ असतो  हे जाणताच .  दुर्दैवाने हिंदी सिने श्रुष्टीत  त्यांनीच  ब्रेक दिलेल्या वहिदा रेहमान अनआणि धर्मपत्नी गीता बाली दत्त यांच्या प्रेमाच्या कात्रीत ते सापडले आणि त्यातच  त्यांचा करून अंत झाला . आणि भारत एका हळव्या मनाच्या मात्र प्रतिभावंत सिने निर्मत्याला मुकला .
            आज त्यांच्या मृत्यू होऊन 54 वर्षे पूर्ण झालीये .मात्र आज देखील त्यांचे नाव आदराने घेतले जाते यातच सगळे आलेना . एका हळव्या मनाच्या प्रतिभावंत सिने निर्मात्याला त्याचा जन्मदिनी मनाचा मुजरा .





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?