आखाती देशातील अशांतता

सध्या तेल उत्पादक असणाऱ्या आखाती देशांत प्रचंड प्रमाणात अशांतता आहे .10 जूलै रोजी इराणने युनाटेड किग्डम या या देशाच्या जहाजांना पकडल्याने त्यात भरच पडली आहे  या तणावाचा केंद्रबिंदू असणाऱ्या
इराणबरोबर आपल्या भारताचे अनेक प्रकल्प सुरू आहेत . त्यांना यामुळे खीळ बसू शकते . शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने पाकिस्तानवर अंकुश ठेवण्यासाठी आपणास इरान अत्यंत महत्तवाचा देश आहे . (पाकिस्तान आणि इराण हे शेजारी  देश असले तरी  दोघांमध्ये अनेक विषयावर वाद आहे )अफगाणिस्तानमध्ये भारताचे अनेक प्रकल्प सुरु आहेत . त्याना  आवश्यक ती मदत इराणमधून आपण करत असतो . याच इराणमध्ये आपण चागबहार हे बंदर विकसीत करत आहोत. जे चीन पाकिस्तानात विकसित करत असणाऱ्या ग्वादार या बंदरापासून हाकेच्या अंतरावर आहे . त्यामुळे  मूळ मुद्दा जरी इराण आणि अमेरिकेबरोबरच असला तरीआपणास  या मुद्यांना बगल देता येणे अशक्य आहे . आपणास याच चष्म्यातून या मुद्याकडे बघावे लागेल .
याची सुरवात कशी झाली हे बघायचे असल्यांस आपणास बराक ओबामा यांच्या कार्यकाळापर्यंत मागे जावे लागते . बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना इराणने अमेरिकेसह अन्य राष्ट्रांबरोबर आण्विक करार केला . जो सध्याचा अमेरिकी प्रशासनाने अर्थात ट्रम्प प्रशासनारे धुडकावून लावत इराणवर आर्थिक निर्बध लावण्याची भाषा सुरु केली . भारतासारख्या अन्य राष्ट्रांना देखील इराण बरोबर व्यापार करण्यास मनाई केली . आणि सुरु झाला इराण अमेरिका संघर्ष .ज्याचा एक टप्पा 10 जुलै ला घातला गेला जो युनाटेड किंग्डम या देशातील  तेलनौका अडवणे हा होता . आपण हि गोष्ट नकाशाद्वारे समजून घेऊ .

पश्चिम आशियात इराणचे आखात आणि ओमानचे आखात यांच्यादरम्यान असलेले होर्मुझचे आखात जागतिक तेल व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत मोक्याचे ठिकाण आहे . या आखाताच्या उत्तरेला इराण आहे आणि दक्षिणेला संयुक्त अरब अमिराती आणि ओमान वसले आहेत. चिंचोळ्या अशा या आखाताचा सर्वाधिक अरुंद भाग अवघ्या ३९ किलोमीटर रुंदीचा आहे. दहा जुलैचे नाट्य घडले ते तेथेच . ही या नात्याची  फक्त सुरवात आहे .पुढे हे नाट्य कोणत्या वळणावर जाते हे बघणे मोठे रंजक ठरेल यात शंका नाही (क्रमशः )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?