73 ची उमर गाठली

                      कविवर्य कुसुमाग्रज यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनला 50 वर्षे पुर्ण झाली , त्यावेळेस "स्वातंत्र्य देवतेची विनवणी " ही फटका या काव्यप्रकारातील कविता लिहली होती . त्याला 2019 या वर्षी  २३ वर्षे पूर्ण झाली .साधारणतः २५  वर्षाची एक पिढी समजली जाते . त्यानुसार  जवळपास एका पिढीचा कालावधी  पूर्ण झाला आहे . त्या कवितेत त्यांनी त्यावेळच्या समस्यांचा उहापोह करत , स्वतंत्रदेवता या समस्यांकडे लक्ष द्या असे सांगत आहे अशी कल्पना करून भारताच्या तत्कालीन समस्या मांडल्या होत्या . आज एव्हढ्या वर्षांनंतरही आजची परिस्थिती बघत असताना असपणास स्पष्ट दिसते की , त्या समस्या अजूनही  जैसे थेच आहेत .किंबहुना त्यांनी अधिकच आवक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे ./ 
                         त्यांनी त्यांच्या कवितेत जाती व्यवस्थेवर , मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर , महिलांच्या  समस्येवर, नोकरशहांच्या  कार्यप्रणालीवर , विविध  ठिकाणी होणाऱ्या शोषणाच्या घटनेविरुद्ध , मराठी लोकांच्या अल्पसंतुष्ट राहण्याच्या प्रवृत्तीवर कोडगे मारले होते . आज त्यातील जाती व्यवस्था अधिकच घट्ट  
झालेली दिसते. पूर्वीपेक्षा अधिक लाचखोरीच्या घटना सध्या वाढलेल्या दिसतात. मराठी भाषा सुद्धा आज हिंदी आणि अन्य भाषेच्या आक्रमकांपुढे हतबल झाली आहे . महिलांची  स्थिती  सुद्धा पूर्वीपेक्षा खालावली आहे ,   खासगी क्षेत्रात होणारी पिळवणूक तर अधिकच वाढली आहे .  नाही म्हणायला मराठी लोकांची  आर्थिक स्थिती मात्र सुधारली आहे . पूर्वी ज्या शेअर बाजारापासून मराठी माणूस दूर राहायचा त्या शेअर बाजारात सुद्धा मराठी माणूस आज सहजतेने गुंतवूणक करताना दिसतोय . हाच तो काय दिलासा ही परिस्थिती अजून खराब न होता .परिस्थिती किमान जैस  थे राहावी अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो ते पुन्हा भेटण्यासाठी . तो पर्यंत नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?