मजहब नही सिखाता

               "मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना " असे एक गाणे आहे . हे आठवण्याचे कारण म्हणजे  मध्यप्रदेशातील जबलपूर येथील एका मनोविकृत माणसाने एका खाद्य वितरण कंपनविरुद्ध केलेली तक्रार . सदर मनोविकृत महाशयांनी या खाद्य कंपनीविरुद्ध तक्रार केली कारण काय तर म्हणे त्याचा धर्माखेरीज अन्य धर्मीयांनी त्यांना खाद्य आणून दिल्याने त्यांचा धर्म बुडाला . मानसिकद्रुष्ट्या  कोणत्या शतकात जगत आहोत आपण सोळाव्या की सतराव्या . कारण सदरचे वागणे हे एकविसाव्या शतकाला शोभेसे नाहीये .अस्या मनोविकृत व्यक्तींनी खरे तर खाद्य वितरण कंपनीसारख्या आधुनिक साधनाचा वापर करुच नये . आपली मानसिकत्या ज्या शतकातली आहे , त्याच शतकात असणाऱ्या साधनाचा वापर करायला हवा .प्राचीन भारतीय तत्वज्ञानानुसार "धारीयते इती धर्मा, अर्थात धारण केला जातो तो धर्म . ह्या मनोविकृत महाशयांनी कोणता धर्म धारण केला आहे त्यांचे त्यांनाच माहिती .               
                  यावर अन्य समाजमाध्यमातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया बघीतल्यावर हसावे की रडावे तेच कळेनासे झाले आहे . अन्य एका धर्मीयांचा मासंहारी अन्नपदार्थाचा वेळी सदर कंपनी कसी वागली याचा दाखला देत
ह्या मनोविकृत माणसाचे वागणे कसे योग्य होते . याचे दाखले दिले जात आहेत . मात्र ह्या लोकांना हे समजत नाहीये . प्राणी कापण्याचा पद्धतीत असणाऱ्या दोन्ही पद्धतीपैकी एका पद्धतीत मृत प्राण्यांच्या  शरीरात रक्त रहात असल्याने असे मांस खाणे आरोग्याला हानीकारक आहे .त्या धर्मीयांचा मध्ये याचे भान राखल्याने एकाच प्रकारचे मांस खाणे त्यांना सांगितले आहे . या मागचे शास्र  सामान्य लोकांना समजणे कठीण असल्याने त्यास धर्माज्ञाचा मुलामा चढवण्यात आला आहे .
                                  पाकिस्तानसारखे भारताचे काही शत्रू राष्ट्र बघा भारतात अल्पसंख्याक समाज सुरक्षीत नाहीत , याचे गाजर वाजवण्यासाठी याचा वापर करु शकतात . हे या मंदबुद्धी लोकांचा लक्षातच येत नाहीये . ते लक्षात येवून त्यांनी सदर मनोरुग्ण व्यक्तीचे प्रबोधन करो ही  इच्छा व्यक्त करुन आजपुरते थांबतो . ते पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?