नारायणराव पेशवे सत्तापिपासू राजकारणाचा बळी

आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध राजघराणी राज्य करुन गेली . त्यापैकी प्राचीनयुगात सातवाहन घराणे आणि मध्ययुगात यादव घराणे अणि भोसले घराणे आणि पेशवा घराणे ही प्रमुख घराणी आहेत .या घराण्याचा काळात समाजव्यवस्था कोणत्या प्रकारची होती . यावर या आधी प्रचंड प्रमाणात लिहले गेले आहे .या घराण्याचा विविध व्यक्तींवर लिहलेलेसुद्धा प्रचंड  साहित्य उपलब्ध आहे. या सर्व घराणे आणि व्यक्तीमत्वातील एका व्यक्तीमत्वाने मला प्रचंड भुरळ घातली आहे . ते व्यक्तीमत्व म्हणजे घराण्यातील सत्तापिपासू काकामुळे ज्याचा अधिकारपदाची वस्त्रे हाती घेतल्यावर तीन महिन्यात किंवा  वयाची 18वर्षे आणि 20 दिवस पुर्ण  झाल्यावर खुन करण्यात आला , ते पेशव्यांमधील सर्वात कमी राजपदावर असणारे व्यक्तीमत्व अर्थात नारायणराव पेशवे
          10 आँगस्ट 1755 ते 30 आँगस्ट 1783 हा त्यांचा कालखंड . त्यांची आणि माझी जन्मतारीख ही सारखीच 10आँगस्ट  . त्यामुळे असेल कदाचित मला नारायणराव पेशवे यांच्या विषयी विलक्षण कुतूहल आहे . त्यांचे अकाली निधन  झाल्यामुळे त्यात वाढच झाली आहे . द्वापारयुगात महाभारतातसुद्धा काका आणि पुतण्यांमध्ये सत्तासंघर्ष झाला . त्याची कलीयुगाच्या
18व्या शतकातील आवृत्ती म्हणून या सत्तासंघर्षाकडे बघता येईल .
              या सत्तासंघर्षामुळे पेशव्यांचा ऱ्हासास सुरवात झाली .बाराबाईचे राजकारण , वसईचा तह , पेशवा इंग्रज यातील तीन युद्धे आणि अखेर 1818 मध्ये शनवार वाड्यावर युनियन जँक फडकणे  अस्या घटनांना या घटनेने जन्म दिला .या सत्ता संघषाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या ऱ्हास झाला . 
नारायणराव पहिले बाजीराव  यांच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान होते . पहिले बाजीराव हे पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे नातू . नारायणराव यांच्या खुनानंतर अनेक नाट्यघडामोडी घडल्या आणि पेशवेपद नारायणराव यांच्या सव्वा वर्षाचा मुलगा सवाई माधवराव यांच्या कडे सोपवण्यात आले . त्यांनी अत्यंत पराक्रम गाजवून पेशव्याना गट विभव प्राप्त करून दिले . 
नारायणराव यांच्या 30 ऑगस्ट 1783 झालेला खून माणसाला सत्तेची हवं कॊणत्या थराला घेईन जाते याचे मूर्तिमंत उदाहरण आहे . नारायणराव यांच्या निधनामुळे पेशवाई  विषयी लोकांच्या मनात  घृणा निर्माण  झाली . . मराठ्यांचे हिंदवी साम्राज सध्याच्या पाकिस्तानातील अटकेपार नेण्याचे  कार्य करणारी . अफगाणिस्तानचे परदेशी आक्रमण परतून लावण्याचा प्रयत्न (पानिपतची तिसरी लढाई ) करणारी पेशवाई त्यामुळे लोकांना समजलीच नाही दुर्दवाने . .हे शल्य मानत ठेवूनच आजपुरते थांबतो ते पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यंत नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?