वाढदिवस जगातील पहिल्या समुपदेशकाचा

     
                                                                       भगवान श्रीकृष्ण यांची  जयंती समस्त भारतात फार मोठ्या उत्साहात  साजरी  करण्यात येते . भगवान श्रीकृष्ण  याना विविध रूपात पुजले जाते .  रणछोडदास कृष्ण , बाळकृष्ण  ,आदी स्वरूपातील कृष्ण ही त्याची प्रमुख रूपे . या सर्व रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णचे एक स्वरूप काहीसे दुर्लक्षित रहाते . ते म्हणजे समुपदेशक श्रीकृष्ण . जगाचा  इतिहासाच्या पौराणिक आणि  भौतिक या दोन्ही प्रकारे आढावा घेतल्यास आपणस हि गोष्ट लगेच लक्षात येते की भगवान श्रीकृष्ण  हे  जगातील पहिले समुपदेशक आहेत . युद्धाच्या प्रसंगी व्दिधा  मनस्थिती असणाऱ्या अर्जुनाला त्यांनी समुपदेशन केले होते . त्याचा आधी कोणत्याही प्रकारात समुपदेशनाच्या उल्लेख आढळत नसल्याने भगवान श्रीकृष्ण हे जगातील पहिले समुपदेशक ठरतात .            
              माझ्या मते भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली  भगवत गीता हा कोणताही अध्यात्मिक ग्रंथ नसून मानसिक आरोग्य  कश्या प्रकारे  उत्तम ठेवावे  हे सांगणारा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे .
                 भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मापासून त्यांना संकटाचा सामना करावा  लागला तरी त्यांनी कधीही हार मांडली नाही .सध्या अत्यंत छोट्या छोट्या कारणांनी निराश होऊन टोकाचे पाऊल उचलणाऱ्या लोकांनी हा आदर्श घेयला हवा . भगवान गोपाळकृष्णचा बालपणीचा आदर्श घेऊन  गोपाळकाला चा उत्सव साजरा करणाऱ्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाचे हे रूप देखील विचारात घ्यायला हवे . तर आणि तरच भगवान श्रीकृष्णचे भक्त म्हणण्यास ते पात्र ठरतील यात तिळमात्र शंका नाही . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?