अवयवदान श्रेष्ठदान
जवळपास सर्वधर्मीयांमध्ये दानाचे अनन्य साधारण महत्व सांगितले आहे . प्राचीन काळी जेव्हा ज्या गोष्टी त्यावेळच्या समाजाला ज्ञात होत्या . त्यातील सर्वाधिक समाजोपयोगी वस्तूंचे दान त्यावेळी करायला सांगितले होते . ज्यामध्ये धान्य , विविध वस्तू आणि आर्थिक वस्तू यांचा समावेश होता . समाज नेहमी प्रगतशील असतो , समाजाच्या जगण्याच्या पध्द्तीत कायम बदल होत असतो त्यानुसार दानाच्या गोष्टी देखील बदललेल्या आपणस दिसतात , . सध्याच्या विविध आरोग्याच्या समस्यासनी माणसे ग्रस्त असताना जर दान करायचे झाल्यास ते मानवी अवयांचे करणे अधिक संयुक्तिक आहे . मानवाने आज कितीही प्रगती केलेली असली तर हात पाय वगळता अन्य मानवी अवयव मानवास अद्याप तयार करता आलेले नाहीत . त्यामुळे अवयवदानाचे महत्व आयनोसाधारण आहे . हे महत्व समाजाला समजावे म्हणून संयुक्त राष्ट संघातर्फे १३ ऑगस्ट हा दिन आंतर राष्ट्रीय अवयदान म्हणून साजरा करण्यात येतो .आपण आपल्या शरीराचे मूत्रपिंड, फुफ्फुसे, हृदय, डोळे, स्वादुपिंड, कॉर्निया, छोटे आतडे, त्वचेच्या ऊती, हाडांच्या ऊती हार्ट वाल्व्ह, शिरा इत्यादी अवयव दान करू शकतो . एक अवयवदाता त्याच्या चांगल्या अवयवांचे दान करून आयुष्यात 8 पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवू शकतो.एका अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे ५ लाख लोक त्यांचे महत्त्वाचे वाया निकामी झाल्यामुळे मृत्युमुखी पडत असतात . आपल्या भारताच्या विचार केला असता ज्या शहराची लोकसंख्या हि ४ लाख असते त्या गावात महानगरपालिका स्थापन करण्यात येते . त्याचा विचार करता आपण समजू शकतो की जवळपास एका मोठ्या महानगर एव्हढी लोकसंख्या जर आपण जर अवयव दान केले तर वाचू शकते . तर तुम्ही करणार ना अवयव दान ?

टिप्पण्या