नितीवाल्या लोकांची अनिती .

सध्या आपल्या महाराष्ट्रात एकच मुद्दा गाजतोय तो म्हणजे पाउस . मराठवाड्यात  काहीच पाऊस नसल्याने आणि सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडल्याने हाहाकार माजला आहे . एकाच राज्यातील ही दोन शहरे मात्र अत्यंत विरोधी हवामान दाखवत आहे  याला कारणीभूत आहे . सध्याचे अत्यंत जलद गतीने बदलणारे हवामान ,  आणि या  प्रकाशाच्या वेगाला लाजवेल अश्या  पद्धतीने बदलत्या हवामानाला कारणीभूत आहे . जगाला सर्वत्र नीतिमत्तेचे धडे देणारा मात्र स्वतः मात्र अत्यंत अनीतीने वागणारा देश अर्थात युनाटेड स्टेस्ट ऑफ अमेरिका . 
    . जगातील सर्वाधिक नैसर्गिक साधनसंपत्तीची नासधूस करून पर्यावरणाची हानी करणारा हा देश .इतरांनी त्यातही प्रामुख्याने आपल्या भारताने आणि चीनने नैसर्गिक साधन संपत्तीच्या अत्यंत काळजीपूर्वक वापर करावा असे सल्ला देणारा हा देश . स्वतःची आर्थिक प्रगती झाली आहे . ही प्रगती करताना आपण प्रचंड
प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीची वाट लावली आहे . आता इतर देशांना प्रगतीची संधी देताना स्वतःच्या नैसर्गिक साधसनसंपत्तीच्या उधळपट्टीला लगाम न  घालणे आवश्यक आहे याची तमा न बाळगता . अन्य विकसनशील  देशानी त्यांची प्रगती अत्यंत कमी नैसर्गिक साधन संपत्तीत स्वतःची प्रगती केली तर आणि तरच आम्ही आमची नैसार्गिकी साधनसंपत्तीची नासधूस करण्याची सवय बदलू अशी दर्पोक्ती करणारा देश हा देश अर्थात युनाटेड स्टेस्ट ऑफ अमेरिका
                  अमेरिकेच्या राष्ट्रपतीने उघड उघड पत्रकार परिषदेत ही भूमिका घेतली आहे.   अमेरिकेने अद्याप पर्यावरणाच्या रक्षणासाठी लागू करण्यात येणाऱ्या क्योटो प्रोटोकॉल , पॅरिस  अग्रीमेंट कोपनहेगन डिक्लरेशन किंवा दर डिसेंबर मध्ये हवामान बदलासाठी होणारी जत्रा अर्थात COP २१ या कोणत्याही परिषदेत पर्यावरण रक्षणासाठी जाहीर केलेली बंधने स्वतःवर लागू करून घेतलेली नाही . मात्र दरवेळी जर भारताने  आणि चीनने स्वतःच्या विकासाच्या रथाला मुरड घालत जर स्वतवर सर्वांच्या सर्व बंधने लादून घेतली तर आम्ही हि बंधने स्वीकारू हि भूमिका घेतली आहे यासाठी या देशांच्या  लोकसंख्येचा बागुलबुवा ते पुढे करतात . 
आज पश्चिम युरोपासह समस्त जग हवामान बदलाचा सामना करत आहे . यावर एकच उपाय मला दिसतो तो म्हणजे समस्त जगाने युनाटेड स्टेस्ट ऑफ अमेरिकाला विरोध करणे . जागतिक पातळीवर याची सुरवात कधीना कधी होईलही . मात्र त्यांची सुरवात होणे आवश्यक आहे . आपल्याकडे अनेक लोक चिनी वस्तूवर बंदी घालावी अशी मागणी करतात . मात्र माझ्या मते चिनी वस्तूवर बंदी घालण्याच्या ऐवजी अमेरिकी वस्तूवर बंदी घातली पाहिजे .तीच सुरवात असेल . आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील वैयक्तिक सत्याग्रहाची मोठी भूमिका आहे . त्याचीच पुनर्वार्ती काण्याची हि संधी आपण घेयालाच हवी अन्यथा इतिहास आपणास माफ करणार नाही हेच खरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?