मराठी जन कधी हे करणार ?

                                मी नूकताच नॉथ वेस्ट कनार्टक स्टेट रोड ट्रान्सपोर्टचा बसने (खरेतर ज्या भागाला बॉम्बे कर्नाटक म्हणतात त्या भागाचा स्टेट टान्सपोर्ट ला नाव माञ नॉर्थ वेस्ट हे नाव. मराठी भाषिकांचा जखमेवर मिठ चोळणे दुसरे काय ? ) नाशिक पुणे प्रवास केला . या बसचे आरक्षण करण्यासाठी मी जेव्हा त्याचा वेबसाईट वर गेलो असता मला आढळलेल्या बाबींसाठी हा लेखनप्रपंच मला आढळलेली महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तींचे भाषाप्रेम  
                त्यांची वेबसाईट पहिल्यांदा उघडते त्याचा भाषेत .साईट उघडल्यावर कोपऱ्यात बारीक अक्षरात त्याची इंग्रजी लिंक दिसते . किती अत्युच्य दर्जाचे हे भाषाप्रेम ! याउलट मराठी जन. माझ्या वैयक्तीक संपर्कात अश्या पंचवीस एक व्यक्ती आहेत ज्यांची मातृभाषा खरतर मराठी, पण मी मराठीत लिहणाऱ्या पोस्टला सुध्दा इंग्रजीत प्रतीसाद देताय .याबाबबत त्यांना विचारले की इंग्रजी ही जगाची भाषा आहे आमचे स्वातंञ्य अशी उत्तरे देतात मला त्या सर्वांना विचारायचे आहे की मराठीत अभिव्यक्त न होण्याचा आणी इंग्रजी येण्याचा संबध तो काय. दाक्षीणात्य व्यक्तींचे इंग्रजी मराठी व्यक्तींपेक्षा सहस्ञ पटीने उत्तम असते माञ ते व्यक्त होतात त्याचाच मातृभाषेत .
                           मी माझा महाविद्यालयीन अभ्यास दौर्यासाठी गुजरातला गेलो होतो . तिथे गांधीनगर अहमदाबाद अश्या शहरात दूकानाच्या जवळपास 95%पाट्या गुजरातीतून होत्या . वर्तमानपञाच्या स्टॉलवर जवळपास 98% वर्तमानपञ गुजराती होते . आपल्याकडे काय स्थिती असते आपण जाणताच . दाक्षीणात्य लोकांनी इंग्रजीतून शिकणे आणी इंग्रजी शिकणे यात योग्य ते संतूलन ठेवले आहे . जागतीक शिक्षणतज्ञांच्या मते सुध्दा मातृभाषा व्यतिरीक्त अन्य भाषेत शिकणे मेंदूला ताण देणारे ठरते . दाक्षीणात्य लोक मराठी लोकांपेक्षा जास्त प्रमाणात शास्ञज्ञ झाल्याचे दिसते कारण ते लोक मातृभाषेत शिकतात नकी मराठी व्यक्ती सारखे इंग्रजीत शिकून आपल्या मेंदूला जास्तीचा ताण देतात सबब ते अधिक चांगला अभ्यास करु शकतात .
                             माझा इंग्रजीला विरोध नाही केवळ मराठी मराठी करावे अशा माझा मुळीच आग्रह नाही इंग्रजी येणे सध्याचा क्रमप्राप्त आहे याची मला पुर्ण जाणीव आहे .पण मराठीला विसरू नये एव्हढेच मला म्हणायचे आहे जाता जाता कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या "स्वातंञ्यदेवतेची विनवणी " या कवितेतील दोन वेगळ्या कडव्यातील ओळी सांगून मी आपली रजा घेतो
पहिल कडव "परभाषेत ही व्हा पारंगत !
दूसर कडव भाषा मरता संस्क्रृती मरते हे ध्यानी धरा !
माय मराठी मरते इकडे पदकीचे पद चेपू नका

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?