युगास्त आणि युगारंभ एकाच वेळेस

                    नुकत्याच आपल्या सर्वांच्या लाडक्या एसटी विषयी दोन बातम्या वाचनात आल्या .एक बातमी सुखद धक्क्का देणारी होती , मात्र दुसरी काहीशी मन हेलावून सोडणारी होती . आपल्या भारतात अनेक गोष्टी प्रथमतः महाराष्ट्रात घडतात . आणि नंतर सर्व भारतात त्याचे अनुकरण होते . याची साक्ष देणारी पहिली सुखद घटना होती ती म्हणजे आजपासून सुमारे ३६ वर्षांपूर्वी भारतात सर्वप्रथम राज्य परिवहन मंडळाकडून आरामदायी सेवा आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून पुरवण्यात आल्यानंतर इतिहासाची पुनर्वार्ती होत  आपले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ इलेट्रीक वाहन चालवणारे भारतातील पहिले  राज्य परिवहन महामंडळ ठरले आहे . नुकत्याचं राजस्थानात तयार झालेल्या या बसेसचे महाराष्ट्रात आगमन झाले . काही चाचण्या नंतर या गाड्या आपल्या सेवेत दाखल होतील . या गाड्यांचे शिवाई असे नामकरण करण्यात आले आहे .  
ह्या बसची काही वैशिष्ट्ये काही वैशिष्ट्य पुढील प्रमाणे असतील 
वाहनाची लांबी १२ मी असून रुंदी २.६ मी असून उंची ३.६ मी इतकी आहे.
. वाहन चालवण्यासाठी ३२२ किलो वॅट क्षमतेची लिथियम आर्यंन फॉस्फेटची बॅटरी वापरण्यात येणार आहे.वाहनाची आसन क्षमता ४३ + १ इतकी असून त्यांना पुश बॅक स्वरूपाची आरामदायक आसने लावण्यात आली आहेत.
. ही बस वातानुकूलित असून ३६ किलो वॅट क्षमतेची वातानुकूलित यंत्रणा लावण्यात आली आहे.
. ही बस एकदा चार्ज केल्यावर कमीत कमी ३०० किमीचा पल्ला गाठणार आहे.
 बस १ ते ५ तासात पूर्ण चार्ज होणार आहे.
. इलेक्ट्रिक बसच्या वापरामुळे प्रदूषणात घट होणार आहे.
 शिवाई चालवण्यासाठी येणारा खर्च हा शिवशाही चालवणाऱ्या खर्चापेक्षा अधिक असून तर शिवनेरी पेक्षा कमी

असणार आहे. 
. वाहन चालवण्यासाठी  लिथियम आर्यंन फॉस्फेटची बॅटरी वापरण्यात येणार आहे.. शिवाई चालवण्यासाठी येणारा खर्च हा शिवशाही चालवणाऱ्या खर्चापेक्षा अधिक असून तर शिवनेरी पेक्षा कमी असणार आहे. *इलेक्ट्रिक वाहन हे एकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी ३०० कि.मी. चा पल्ला गाठणारे आहे. तदनंतर सदर बसच्या चार्जिंगसाठी किमान १ ते ५ तास (१ तास जलद चार्जिंग व ३ ते ५ तासाचे सर्वसाधारण चार्जिंग) इतका वेळ लागणार आहे. इलेक्ट्रिक वाहन हे १ किलो वॅटमध्ये किमान १ ते १.२५ कि.मी. चालण्याची अपेक्षा आहे. इलेक्ट्रिक बसच्या वापरामुळे प्रदूषणात फार मोठ्या प्रमाणावर घट होणार असून, डिझेल सारख्या इंधनाचा वापर बंद होणार आहे.

 इलेकट्रीक वाहनाचे चालन हे बॅटरी व मोटर यांच्या सहाय्याने होणार असल्यामुळे इंजिन, गिअर बॉक्स, ट्रान्समिशन इत्यादी बाबींच्या सामान खर्च तसेच देखभालीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही.
या सुखद बातमी बरोबर दुसरी दुःखद बातमी देखील होती . ती म्हणजे भारतात आरामदायी प्रवासाची सुरवात करणाऱ्या एशियाड अर्थात हिरकणीच्या सेवेला ब्रेक . सध्या एशियाडची निर्मिती करण्याची प्रक्रिया महामंडळाने थांबवली असून सध्या वापरत असणाऱ्या एशियाड बसेस या कालांतराने साध्या परिवर्तन बसेस म्हणून वापरण्यात येणार आहेत . सन १९८३ साली नवी दिल्लीत झालेल्या एशियाड खेळाच्या वेळी खेळाडूंच्या प्रवासांसाठी याची निर्मिती आपल्या महाराष्ट्राकडून करण्यात आली होती. आपल्या महाराष्ट्राच्या डायव्हरनी त्या बसेस महाराष्ट्रातून नवी दिल्लीत नेल्या होत्या  खेळ संपल्यावर या बसेसचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाल्यावर मुंबई ते पुणे या मार्गावर त्या चालवण्याचा निर्यय घेण्यात आला .
आणि महाराष्ट्रातील जनतेला आरामदायी प्रवास करता येऊ लागला . कालांतराने अन्य मार्गावर देखील या बसेस चालवल्या जाऊ लागल्या . अशा हा इतिहासाचा ठेवा आता काळाच्या पडद्याआड जात आहे . बदल ही  एकच गोष्ट जगात न बदलणारी आहे. या न्यायाने हा बदल  कधीना कधी होणारच होता मात्र तो इतका दुःखद असेल असेल अशी माझी कल्पना नव्हती .  हा बदल सुखद असेल . एशियाड प्रकारच्या गाडयांना समाधानपूरक निरो देण्यात येईल अशे मला वाटले होते . दुर्दैवाने तसे होण्याची शक्यता कमीच आहे . असो या पुढे होणारे बदल सुखद असतील अशी अशा व्यक्त करून सध्या पुरते थांबतो



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?