या लोंढ्याना आवरणे ही काळाची गरज

                             नुकताच मी  काही कामनिमित्य भिवंडी येथे गेलो होतो.  तेथील एसटी स्टॅण्डवर मी गुजरात राज्य परिवहनाची एक बस बघितली . मला उच्छूकता वाटल्याने मी बसेसबाबत आधी चौकशी केली असता , मला समजले की .
ती सुरत ते मुंबई सेंट्रल या दरम्यान भिवंडीमार्गे  धावणारी  बस होती . आपण जर नकाश्यात सुरत ते मुबई सेंट्रल या दरम्यानच्या रस्ता बघितला तर त्यात कुठेही भिवंडी येत नाही . मग ही बस भिवंडीवर आली कुठे ? तर जो सुरत ते मुंबई दरम्यान असणाऱ्या मुंबई ते दिल्ली महामार्गावरून   मुंबईपासून  हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चीकानेर येथून हि बस वाडामार्गे भिवंडी येथे जाते तिथून ठाणे मार्गे मुंबईत येते , आहे कि नाही, गंमत .
                                             याचा आधी मी पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर गुजरात राज्य परिवहनाची अहमदाबाद ते कोल्हापूर अशी स्लीपर व्होलो गाडी बघितली होती  मित्रानो कोल्हापूर पासून सुमारे २५ किमीवर महाराष्ट्र संपून कर्नाटक राज्य सुरु होते . म्हणजे  तुम्ही बघू शकता अन्य राज्याच्या परिवहन सेवेच्या बसेसचा आपल्या महाराष्ट्रात किती विस्तार आहे तो ?त्याचा प्रमाणे सुरतेहून पंढरपूर , उस्मानाबाद या ठिकाणी जाणाऱ्या GSRTC च्या गाड्या कित्येकदा नाशिकच्या बस स्टॅण्डवर बघितल्या आहेत .   मी  मला महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेचा इतका
लांबवर विस्तार आढळलेला नाही .  एकवेळ आपण खाजगी बस चालकांना एसटी बस स्थानकाच्या बाहेर ५०० मीटरवर नेऊ शकतो . मात्र अन्य राज्यांच्या परिवहन महा मंडळाच्या बसेस या आपल्या मालकीच्या जागेत आपल्या  बसेसच्या शेजारी स्वतःची बस उभी करून महाराष्ट्रात आपला व्यवसाय करतात . त्यांनी महाराष्ट्र एसटीला घरातच स्पर्धक निर्माण केला आहे . त्यामुळे म्हणावेसे वाटते महाराष्ट्रत्तेर  राज्य परिवहन महामंडळाच्या लोंढ्याना आवरणे ही काळाची गरज आहे . तुम्हाला काय वाटते . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?