दूरसंचार क्षेत्रातील अस्वस्थता

           
    सध्या आपल्या महाराष्ट्रात आगामी मुख्यमंत्री कोण होणार ? या बाबत पारंपरिक प्रसारमाध्यमे आपल्याला माहिती देत असताना,  आज एक इंग्रजी वृत्तवाहिनी बघताना समोर आलेल्या दूरसंचार क्षेत्रातील बातमीने माझी अक्षरशः झोप उडाली आहे . ती बातमी आहे , भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या खासगी कंपनीच्या तोट्याची . एअरटेल आयडिया - व्होडाफोन या दोन कंपन्यांना सुमारे ७० हजार कोटी रुपयाचा तोटा झाला आहे मित्रानो केंद्र सरकारची सर्वात लोकप्रिय असणाऱ्या मनरेगा या येजनेसाठी सरकार ६१ हजार कोटी रुपये खर्च करते हे आपण या तोट्याकडे बघताना लक्षात घेतले पाहिजे . एकीकडे सरकारी दूरसंचार कंपन्या असणाऱ्या  बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन कंपन्या तोट्यामुळे चर्चेत आल्या असतानाच ही  बातमी येणे भारतातील एकूणच दूरसंचार क्षेत्राची स्थिती कशी आहे ? हे पुरेसे स्पष्ट करणारे आहे . यात शंकाच नाही .
                                                                        या तोट्याला जे कारण  या कंपन्यांकडून देण्यात येत आहे ते AGR  अर्थात AGGREGATE GROSS REVENUE चे .  सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार दूरसंचार कंपन्यांना        सरकारला द्याव्या लागणाऱ्या रक्कमेमुळे त्यांना  हा तोटा आहे असे स्पष्टीकरण दूरसंचार कंपनींनी दिले आहे .  दूरसंचार  कंपन्यांच्या नफ्यामध्ये त्यांच्या ग्राहकांकडून मिळणाऱ्या रक्कमेबरोबरच 
त्यांच्या  सर्व मालमत्तांद्वारे   मिळणाऱ्या  पैसांचा समावेश करण्यात  यावा   हाच तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होय . त्याला AGR  अर्थात AGGREGATE GROSS REVENUE म्हणतात . सन २००२ मध्ये हा मुदा प्रथम चर्चेत आला , यावर सहमती ना झाल्याने २००९ मध्ये या मुद्यावरून सर्वोच्च न्ययालयात खटला दाखल करण्यात आला . ज्याचा निकाल नुकताच लागला . त्यानंतर या दूरसंचार कंपन्यांना  सरकारला द्याव्या लागणाऱ्या करापोटी त्यांना तोटा सहन करावा लागत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली .
       यामुळे सध्या आपण ज्या दरात बोलतो आणि इंटरनेटचा फायदा घेतो त्यामध्ये मोठी दरवाढ होण्याची दाट शक्यता आहे . हे दूरसंचार कंपन्यांवरील संकट लवकरत लवकर दूर होवो , त्याची ग्राहकास कमीत कमी झळ लागो हि सदिच्छा व्यक्त करून आज पुरतो इथेच थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?