वणवा कांगारूंच्या देशातील

                                                               सध्या विविध घडामोडीनी आपला भारत आणि महाराष्ट्र  अक्षरशः ढवळून जात असताना, पृथ्वीगोलावर आपल्या भारताच्या साधारणः विरोधी बाजूवर असलेल्या ऑस्ट्रोलियच्या पूर्व बाजूला आतापर्यतच्या ज्ञात इतिहासातील सर्वात मोठ्या वणव्याने तेथील सरकारची अक्षरशः झोप उडवली आहे .  तेथील न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलँड या दोन राज्यात आणीबाणी जाहीर जाहीर करण्यापर्यंत तेथील परिस्थिती बिघडली आहे . हा लेख लिहीत असताना त्यामध्ये किमान 8 लोकांच्या मृत्य झाल्याचे वृत्त आहे .
           मित्रानो पृथ्वीगोलावर भारताच्या साधारणतः विरोधी बाजूवर असलेल्या ऑस्ट्रोलियच्या पूर्व बाजूला भूभागाचे आपणास काय त्याचे  असे सर्व साधारण आपणस वाटू शकेल ?  मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की , येव्हढ्या मोठ्या प्रमाणात  वणवा पसरण्याची  जी कारणे सांगितली जात आहेत , त्यांमध्ये तेथील बदलते हवामान हे एक प्रमुख असल्याचे बोलले जात आहे .
            मित्रानो  याचा आपणास असणारा धोका समजण्यासाठी  भारताच्या मान्सूनवर  खूप मोठ्या
प्रमाणावर परिणाम करणाऱ्या अलं लिनो आणि ला नीना या समुद्री प्रवाहाचे  स्थान आपणास  माहिती करून घ्यावे लागेल. हे स्थान ज्या ठिकाणी वणवा लागला आहे  त्या ठिकाणापासून फारसे लांब नाही . तुम्हला हेही माहिती असेलच की स्थानिक हवामानाचा या समुद्री प्रवाहावर काय परिणाम पडतो . त्यामुळे हा प्रश्न निव्वळ ऑस्ट्रोलियाचा म्हणून चालणार नाही . 
                              मित्रांनी  ऑस्ट्रोलिया हा दक्षिण गोलार्धातील देश आहे सध्या तिथे उन्हाळ्यची सुरवात होत आहे . त्यामुळे येणारा उन्हाळा तिथे काय परिणाम करतो . अश्या आगी तिथे किती लागतात हे बघणे आपल्यासाठी  महत्त्वाचे आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?