विलुप्त होणाऱ्या गेंड्याच्या प्रजातीविषयी थोडेसे

                सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना, पृथ्वीच्या जैवविविधेतेवरचे संकट म्हणता येईल , अशी घटना 23 नोव्हेंबर 2019 ला  मलेशिया या देशात घडली . मात्र आपल्या भारतीय माध्यमात या विषयी फारसे काही चर्चिले गेले नाही . तर चला मित्रानो माहिती करून घेउया या घटनेविषयी  मित्रांनो , सर्वात वजनदार शाकाहारी प्राण्यांपैकी एक म्हणून  म्हणून  ज्या  प्राण्यांकडे बघितले जाते , तो म्हणजे गेंडा . या गेंड्याच्या एका प्रजातीविषयीच आजचा लेख आहे . तर, जगभरात गेंड्याच्या 5  प्रजाती आढळतात . त्यामध्ये आकाराने सर्वात लहान म्हणून ओळखली जाणारी प्रजाती म्हणजे सुमात्रीयन गेंडा . जो फक्त इंडोनेशिया आणि मलेशिया या देशात आढळतो . ( खरेतर या देशाच्या यादीतून मलेशिया आता वगळायला हवे ) युनोस्कोच्या  अत्यंत धोकादायक स्थितीत असणाऱ्या प्राण्यांच्या यादीत या प्रजातीच्या गेंड्याचा फार  वरचा क्रमांक लागतो .
                 तर अश्या  स्थितीत असणाऱ्या  सुमात्रीयन गेंड्यांच्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी घटना 23 नोव्हेंबर 2019 ला  मलेशिया या देशात घडली  या देशातील या प्रजातीच्या शेवटच्या गेंड्याचे निधन झाले . आता मलेशियातून  या
प्रजातीच्या गेंड्यांचे नामोनिशाण नष्ट झाले असून , हा  लेख लिहीत असताना आजमितीस या प्रकारचा गेंडा फक्त इंडोनेशिया या देशात शिल्लक राहिला आहे , आणि त्या देशात फक्त या प्रकारचे फक्त 60 ते 80 गेंडे शिल्लक राहिले असल्याचे सरकार दरबारी नोंद आहे . ऱ्हासाबाबत  तुम्ही शेजारच्या नकाश्यात याचा अधिवास कुठे आहे ते बघू शकतात . सदर नकाश्यात ज्या ठिकाणी हिरव्या रंगात बदल आहे , अश्या मोजक्या ठिकाणी तो अस्तित्वात आहे . 

       मित्रानो सध्याच्या हवामानबदलाच्या काळात अशी प्रजाती नष्ट होणे ही  खूप  मोठी गोष्ट आहे . सुमात्रीयन गेंड्यांच्या ऱ्हासाबबत जी कारणे दिली जात आहे , त्यामध्ये त्यांच्या अधिवासात त्यांना राहण्याजोगी जागाच  शिल्लक नसल्याचे प्रमुख कारण दिले आहे . आणि  यासाठी मानवी हस्तपेक्षाला जवाबदार धरण्यात आले आहे .त्यामुळे याचे गांभीर्य अधिकच वाढले आहे . गेंड्याच्या या प्रजातीत प्रजोत्पादनाचा दर अत्यंत कमी म्हणजे ४ वर्षात एक पिल्लू इतका कमी आहे . त्यात  अत्यल्प संख्येमुळे यातील गांभीर्य वाढले आहे .
              यामध्ये सकारात्मक बदल व्हावा यासाठी  इंडोनेशिया आणि मलेशिया तर्फे सध्या जागतिक तज्ज्ञांच्या मदतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहे .त्याला चांगले बदल घडावे अशी अपेक्षा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?