बिगुल ४६ व्या अमेरिकी राष्ट्रपतींचे

सध्या आपल्या महाराष्ट्राचे लक्ष आगामी मुख्यमंत्री कोण होणार ? याकडे लागले असताना जगातील एक प्रबळ सत्ता असलेल्या युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत सध्या दोन मुद्यांनी  भल्या भल्या लोकांची अक्षरशः झोप उडवली आहे . त्यातील एक मुद्दा म्हणजे अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार का ? हा असून दुसरा मुद्दा म्हणजे ३ नोव्हेंबर २०२० ला अमेरिकेच्या ४६ वे  राष्ट्राध्यक्ष कोण होणार ?
मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी फारसे बोलणार नाही . मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे . ते ३ नोव्हेंबर २०२० ला Elector  कोणाच्या गळ्यात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाची माळ घालतात . अर्थात २० जानेवारी २०२१ ला होणाऱ्या  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्याकडे   
दोस्तांनो ,  अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या सुमारे दिड ते पावणे दोन वर्ष आधीच सुरु होते . या न्यायाने ही प्रक्रिया सुरु झाली आहे . ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे . 
आता आपण या ची माहिती घेउया 
हि निवडणूक कधी होते 
ही निवडणूक कधी होणार हे ठरलेले आहे . प्रत्येक ४ वर्षांनी येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये जो पहिला सोमवार येईल त्यांनंतरच्या  पहिल्या मंगळवारी ही प्रक्रिया होईल .समजा १ नोव्हेंबरला मंगळवार असेल तर तो महिन्यातील पहिला मंगळवार  असला तरी तो महिन्यातील पहिल्या सोमवार नंतर आलेला मंगळवार नसल्याने त्या मंगळवारी हि निवडणूक होणार नाही ती होईल ७ तारखेचा सोमवार झाल्यावर पुढील दिवशी अर्थात ८ नोव्हेंबरला .  या उलट जर १ नोव्हेंबरला जर सोमवार असला  तर २ नोव्हेंबरला हि निवडणूक होऊ शकते 
याला कोण मतदान करू शकते ? 
आपल्यापैकी अनेकांना वाटत असते की,  सर्वसाधारण अमेरिकी नागरिक या मध्ये मतदान करू शकतो , तर आपण चुकलात .  अमेरिकी नागरिक प्रत्यक्ष आपल्या अध्यक्षाला निवडत नाहीत . ते निवडतात . Elector  ला आणि हे Elector  अध्यक्षाला निवडतात . यां Electore यांची एकत्रीत  संख्या असते ५३८ . . हे ५३८ लोक अमेरिकेची ज्यांना राज्य म्हणून मान्यता आहे .त्या ठिकाणाहून  निवडले जातात .
अमेरिकेच्या मालकीचे  जगभर    काही बेटे आहेत . तो प्रदेश युनाटेड स्टेस्टस अमेरिकेच्या समजला जात असला तेथील नागरिक युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे नागरिक समजले जाते असले तरी तेथून हे ELECTOR वडले जात नाही . याला एका अपवाद आहे . तो म्हणजे कोलंबिया डिस्ट्रिक चा.  हा अमेरिकन प्रदेश जरी जरी राज्य म्हणून नसला तरी तेथून ३ ELECTOR निवडले जातात .एखाद्या राज्यातून किती इलेक्टरवड निवडले जाणार हे त्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलूंबून असते . 
या निवडणुकीची प्रक्रिया कशी असते /
हि निवडीची प्रक्रिया ४ टप्यात होते . त्यातील पहिले दोन टप्पे हे पक्षीय पातळीवरचे असतात . तिसरा आणि चौथा टप्पा हा संपूर्ण देश पातळीवरील असतो . या सर्व टप्प्याची माहिती आपण पुढील भागात घेउया , तो पर्यंत नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?