पंडित नेहरूंच्या जयंतीच्या निमित्याने

                              भारताच्या स्वातंत्र्याला आज रोजी 72 वर्षे पूर्ण पूर्ण झाली आहे . या ७२ वर्षात त्याच्या प्रगतीसाठी विविध लोकांनी प्रयत्न केले . त्यामध्ये भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरू यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे आजच्या काळात त्यांचा काळातील एकही राजकारणी जिवंत नाही ..सध्याचे राजकारण पुर्णत: त्यानंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्यां हातात आहे . माञ तरीही जे राष्ट्र आपला भूतकाळ विसरते ते आपला भविष्यकाळ गमवून बसते अश्या अर्थाचे एक वचन आहे . त्या अनुषंगाने आजच्या चष्म्यातून  नेहरू काळाचा आढावा घेतल्यास आपणास खालील गोष्टी दुर्लक्षून चालणार नाही 
 1)नियोजन आयोग ते नीती आयोग
2)औद्योगिक धोरण 1948/1956 ते नमो धोरण
3)नामची स्थापना, चीन युध्द ते BRICS आर्थिक पॉवर
4)वराह खाद्य खाणारा ते अन्नधान्य उत्पादक देश
5)सायकलवरून रॉकेटचे साहित्य नेणारा देश ते चंद्रावर,   मंगळावर जाणारा देश
6) मिळणारे सदस्यत्व नाकरणारा आणि सध्या त्या सदस्यत्वासाठी भांडणारा देश
                                       आता त्या गोष्टी सविस्तर बघू
1)नियोजन आयोग ते नीती आयोग = पंडित नेहरुंवर साम्यवादी धोरणांचा प्रचंड प्रभाव होता . साम्यवादी रशियात ज्या प्रमाणे सप्तवार्षिक योजना राबवून विकास केला जातो त्या प्रकारे भारताचा विकास करण्यासाठी त्यांनी नियोजन आयोग हा Extra constitution असणारा आयोग आणि पंचवार्षिक योजना निर्माण केल्या .सुरवातीच्या काही योजना यशस्वी ठरल्यानंतर नंतरच्या पंचवार्षिक योजना अपयशी ठरल्या.  सध्याच्या नमो सरकारने त्या बंद करुन नीती आयोगाची स्थापना केली आहे .
2)औद्योगिक धोरण 1948/1956ते नमो धोरण = भारत स्वतंञ झाला त्यावेळेस भारतात औद्योगिकीकरण नव्हते भारतात औद्योगिकीकरण सुरू करण्यात 1948 आणि 1956 च्या औद्योगिक धोरणांणचा मोठा वाटा आहे या धोरणांन्वये आपण टप्या टप्याने सामाजवादी धोरण स्विकारले,  ज्याचा परिणाम स्वरुप आपण सुरवातीला प्रचंड प्रगती केली.  नंतर या पध्दतीत अनेक दोष शिरले परीणाम स्वरुप भारत कंगाल झाला,  आणि आपण जूलै 1991ला सध्या प्रचलीत असणारे धोरण स्विकारले
3)नामची स्थापना,  चीन युध्द BRIC ची स्थापना आर्थिक पॉवर = भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात पंडीत नेहरुंचा मोलाचा वाटा होता त्यांनी केलेली नामची स्थापना भारताच्या  आंतरराष्ट्रीय राजकारणातील  नेतृवाची चुणुक होती . जे सध्या जी 77 जी 4 आदी व्यासपीठांवरुन पुढे नेत आहोत .असे असले तरी चीन बाबत झालेली नेहरुंची चुक नाकारुन चालणार नाही .माञ त्याच चीनबरोबर आपण BRICS सारख्या संघटनांच्या माध्यमातून आर्थिक ताकद बनत आहोत .
4)वराह खाद्य खाणारा ते अन्न उत्पादक देश = स्वातंञ प्राप्तीच्या वेळी 88%लोकसंख्या शेतीवर अवलुंबून असून
देखील ती उरलेल्या लोकांचे पोट भरू शकत नव्हती,  त्या लोकसंख्येला खाण्यासाठी आपण युनाटेड स्टेटस आँफ अमेरीका या देशातून मिलो नामक तेथील PIGS खाणारे अन्न आपण खायचो.  आता आपली लोकसंख्या तिप्पट वाढून सुध्दा आणि शेतीचे क्षेञ कमी होवून सुध्दा सर्वांचे पोट भरु शकतो तसेच अन्नधान्य निर्यात करू शकतो,  याचे श्रेय निर्विवादपणे पंडीत नेहरुंना द्यावे लागेल, त्यांच्या कार्यकाळात झालेल्या धरणानी पुढे हरीत क्रांतीचा पाया रचला
5)सायकलवरून राँकेटचे साहित्य वाहून नेणारा देश ते चंद्रावर मंगळावर जाणारा देश = विज्ञानाची कास ओळखुन नेहरुंनी इस्रो  आणि भारतीय अणूविज्ञान विभागाची स्थापना केली ज्याचे फळ आपण बघतो आहोच त्यामुळे आपल्या शेजाऱ्यासारखे अणू तंञज्ञान आपणास चोरुन आणावे लागले नाही किंवा विकावे लागले नाही
6)मिळणारे सदस्यत्व नाकारणारा देश आणि आता त्या सदसयात्वाकरीता भांडणारा देश = युनाटेड नेशन्सच्या स्थापनेच्या वेळी आपणास त्याचे कायमस्वरुपी सदस्यत्व मिळत होते आपण ते नाकारुन युनाटेड स्टेटस आँफ अमेरीकेचा विरोध असताना देखील  चीनला देण्यास भाग पाडले.  आज तोच चीन  आपल्याला युनोच्या सदस्यासाठी  विरोध करत आहे .त्याला ती भूमिका सोडून आपल्याला मदत करण्याची इच्छा होवो  ही सदिच्छा व्यक्त करून सध्या पुरत थांबतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?