चित्रपटातील गीत ते 2+2 बैठक, मार्गे G-4 भारत जपान मैत्रीचा प्रवास (भाग 1)

                          सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना, आपला भारत जागतिक राजकारणात मोठ्या दौडाने आपला  अश्व पुढे  नेत आहे . याची साक्ष देणारी घटना नुकतीच भारत जपान मैत्रीसंदर्भात घडली . ती म्हणजे भारत आणि जपान यांच्या मध्ये झालेली  2+2 बैठक होय . दोन्ही देशाच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये ही बैठक पार  पडली . या बैठकीमध्ये कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली , कोणत्या मुद्यावर करार आणि Memorandum Of Understanding (MOU ) झाले . याची माहिती आपणास पारंपरिक माध्यमांतून आपणास मिळेलच.  . मला आपणाचे लक्ष वेधून घेयचे आहे . ते भारताचा   इथपर्यंत प्रवास कसा  झाला ? तर सुरवात करूया सविस्तर विवेचनला . 
                मित्रानो मध्ययुगात चीनमार्फत बौद्धधर्म  जपानमध्ये पोहोचला . हे आपणास ज्ञात असेलच हे सांस्कृतिक आदानप्रदान झाले . आर्थिक आणि तंत्रज्ञाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास  त्यातही विशेषत्वाने भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जपानच्या ताकदीच्या सर्वप्रथम उल्लेख स्वामी विवेकांनद यांच्या पहिल्या अमेरिकेच्या प्रवासात येते . त्यांनी त्या वेळेस म्हणून ठेवले आहेच.  चीन आणि जपान निद्रिस्त ड्रॅगन आहेत . ते जेव्हा जागे होतील तेव्हा
जगाची झोप उद्वातील मात्र हा झाला ब्रिटिश इंडियातील उल्लेख .स्वातंत्रप्राप्तीनंतर जपानच्या ताकदीच्या उल्लेख येतो तो राजकपूर याचा श्री 420 या चित्रपटात " मेरा  जुता है जपानी " हे अजरामर गाणे आपल्याला अल्पावधीत जपानने केलेल्या प्रगतीची साक्ष देते .जपानने केलेल्या प्रगतीची घोडदौड सुरूच असून बहुचर्चित बुलेट ट्रेंनपासून विविध खत निर्मितीतीच्या प्रकल्पापर्यंत जपान आपणास साह्य करत आहे .   
                 राजनैतिकी भूगोलाच्या शेजारील राष्ट्राच्या पलीकडे असणारे राष्ट्र  आपले मित्र या सिद्धान्तानुसार आपण जपानशी 1962 च्या युध्द्दांनंतर संबंध वाढवण्यास सुरवात केली . हे साह्य नंतर अनेक क्षेत्रात विस्तारले . संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत नकाराधिकारासह कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी जर्मनी आणि ब्राझील समवेत G 4 या गटाची स्थापना करणे , आदीपर्यंत हा प्रवास झालेला दिसतो.  नुकतीच झालेली  मंत्रिपरिषदेची 2+2 बैठक या विषयीचा कळस म्हणता येईल . या आतापर्यंतचा वाटचालीत अनेक चढ उतार आले . उदाहरणार्थ  जेव्हा भारताने अणुस्फोट केला त्यावेळी जपानने आपल्यावर अनेक बंधने लादली . आणि आपले संबंध काही प्रमाणात दुरावले 
                चीनच्या वाढत्या सागरी महत्त्कांक्षालेला आळा घालणे सोईचे व्हावे यासाठी  अनेकदा जपानी आरमार  आणि भारतीय नौदल हिंदी महासागरात संयुक्त आरमारी कवायती करत असतात . हे आपणास ज्ञात आहेच .  त्याचप्रमाणे जपानी व्यवस्थापनाविषयी देखील काही लोकांना माहिती असेलच , आपल्या भारताच्या अनेक कारखान्यात त्या व्यवस्थापन तत्वावर आधारित काम केले जाऊन अत्यंत कमी श्रमात अधिक उत्पादन काढले जाते . जपानी कार्टून विश्वाने भारतीय समस्त बालविश्व व्यापून गेलेले आपण बघतो आहेच , डोरेमॉन , निन्जा हतोरी हि त्याची काही उदाहरणे भारतातील दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात होंडा या वाहन उद्योग क्षेत्रातील कंपनीची उलाढाल आपणांस माहिती आहेच . 
भारत जपान  विषयक खूप काही बोलण्यासारखे आहे . मात्र तुम्ही माझ्या पोस्टची वेळ बघत असलाच बरीच रात्र झाल्याने सध्यापुरते थांबतो 
, नमस्कार .  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?