वादगस्त पर्वाची अखेर? (डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छती भाग 3)

     
           नुकतेच अमेरीकेन काँग्रेसच्या हाउस आँफ रिप्रेझेनटेटिव्ह या सभागृहात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव संमत करण्यात आला , आणि पुढील कार्यवाहीसाठी सिनेटमध्ये पाठवण्यात आला . डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खरोखरच महाभियोग होतो का? की या आधी तिनदा ज्या प्रकारे महाभियोगाचा प्रस्ताव मतदानाचा टप्यावर बारगळला त्याच प्रकारे बारगळतो ?हे आपणास लवकरच समजेल .मला आपले लक्ष वेधून घ्यायचे आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा आतापर्यतचा कारकिर्दीवर
                  डेमोक्रेटीक पक्षाच्या बराक ओबामा यांची मुदत संपल्यावर 2016 साली झालेल्या अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेमोक्रेटीक पक्षाच्या  हिलरी क्लिंटन यांना पराभुत  करुन अमेरीकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टिचे  डोनाल्ड ट्रम्प हेे निवडून आले .  आणि एका वादगस्त पर्वाला सुरवात झाली.
       मुळात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडीच्या सदोष प्रणालीमुळे त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटनवर त्यांनी विजय मिळवला , जो अत्यंत वादग्रस्त होता . बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना हिलरी क्लिंटन या सेक्रेटरी ऑफ स्टेट या पदावर कार्यरत होत्या . भारताच्या गृहमंत्री समकक्ष हे पद  आहे . सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणून कार्यरत असताना हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्यासाठी तयार केलेल्या सरकारी ईमेलचा वापर न करता स्वतःच्या वैयक्तिक ईमेल आयडीचा वापर सरकारी कामासाठी वापर करून त्यांनी अमेरिकेची सुरक्षा धोक्यात आणली , या साठी त्यांना तुरुंगात जायला भाग पाडू . असे निवडणूकपूर्व आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी नंतर या प्रकरणाची चौकशी थांबवली . त्यांच्या माध्यमांशी वागायच्या पद्धतीवर बऱ्याच
प्रमाणात टीका झाली . त्यांनी घेतलेल्या मेक्सिको देशाच्या सीमाहद्दीवर भिंत उभारण्याच्या निर्णय देखील बराच गाजला . अमेरिकेतील अनेक राज्यांनी त्यावर तीव्र नापसंती दर्शवली होती . त्यांच्याच काळातच अमेरिकेत इतिहासातील सर्वात मोठे शटडाऊन झाले . त्यांच्या निवडून येण्यामागे रशियाचा हात होता,  अशाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला . मात्र याही आरोपाची पुरेशी चौकशी न होताच प्रकरण गुंडाळ्यांत आले . मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या युक्रेनच्या पंतप्रधानांवर आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या संदर्भात स्वतः ला सोईस्कर अशी भूमिका घेण्याबबाबत दबाव निर्माण करण्याचा आरोपांबाबत मात्र त्यांची डाळ शिजली नाही . त्यावरून त्यांना महाभियोगाला सामोरे जावे लागले . ज्याचा एक अत्यंत महत्वाचा अध्याय नुकताच झाला . 3 नोवेंबर 2020ला होणाऱ्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत  हा मुद्दा चांगलाच रंग भरणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे . टीव्ही डिबेटच्या वेळेस हा मुदा कसा रंगतो?  हे बघणे खूपच रंजक असेल . घोडामैदान जवळच आहे  त्यामुळे आपणस जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही , बघूया काय होते ? मी हे नाट्य आपल्यापर्यत वेळोवेळी पोहोचवत जाईल तूर्तास थांबतो , नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?