जेव्हा एका घटनादुरुस्तीमुळे दुसरी घटना दुरुस्ती झोकोळली जाते तेव्हा ........

                           सध्या समस्त भारत नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे घुसमुळून जात असताना संसदेमध्ये इतर अनेक विधेयके सुद्धा मंजूर करण्यात आली आहेत . जी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे . मात्र त्याविषयी भारतीय माध्यमांमध्ये फारशी  चर्चा झालेली नाही . माझे आजचे लेखन त्या घटनादुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी आहे . मला  ज्या घटनादुरुस्तीकडे आपणाचे लक्ष वेधायचे आहे . त्यामुळे लोकसभेतील आणि काही राज्याच्या विधानसभेतील  सदस्य संख्येत बदल झाला आहे .  तर समस्त भारत CAA  वरील चर्चेत दंग असताना आपल्या संसदेत 126 व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती झाली . ज्या अन्वये भारतीय संविधानाच्या कलम 331,  333 आणि कलम  362 च्या उपकलम 2  या कलामामध्ये बदल करण्यात आले.  कलम 331नुसार लोकसभेमध्ये अँग्लोइंडियन समाजाला 2 सदस्यांचे  प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली होती.  तर कलम 333नुसार राज्य विधानसभेत अँग्लो इंडियन  समाजाला 1सदस्यांची तरतूद करण्यात आली आहे . या दोन्ही ठिकाणी राष्ट्रपती सदस्यांची नेमणूक करत असे  . कलम 362च्या उपकलम 2 मध्ये अँग्लो इंडियन कोणास म्हणावे याची व्याख्या करण्यात आली आहे . भारतीय संविधानाच्या कलम 362 च्या पोटकलम 2 नुसार ज्यांचे वडील अथवा वडिलांकडील काही सदस्य युरोपीय आहेत . मात्र ज्यांचे मातृलस्थान भारतीय आहेत . आणि जे भारतात अस्थायी स्वरूपात राहत नाहीत , अश्या  सदस्यांना अँग्लो इंडियन म्हणतात .
           आजमितीला 14 विधानसभेत अश्या  प्रकारे सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे . तर सध्याच्या
लोकसभेत या प्रकारची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे करण्यात आलेली नाही . अँग्लो इंडियन समाजाच्या संघटनेनुसार आजमितीला देशभरात सुमारे साडेतीन लाख अँग्लो इंडियन लोक आहेत . तर सरकारतर्फे  त्यांचे प्रतिनिधित्व काढून देताना  2011 मध्ये करण्यात आलेल्या जनगणना संख्येचा आधार देऊन सांगण्यात आले आहे की आजमितीस भारतात फक्त 296 अँग्लो इंडियन आहेत . संख्येचा विचार करता आज भारतातील सर्वात अल्पसंख्यांक समाज म्हणून त्यांच्याकडे विशेष लाख देण्याची गरज असताना सरकारने त्यांचे घटनादत्त सरंक्षण काढले आहे मात्र कोणत्याही क्षुल्लक घटनेला अवास्तव महत्व देणाऱ्या माध्यमांना या समाज घटकांचा क्षीण आवाज दिसला नाही . अशी वेळ दुसऱ्या कोणत्याही समाज घटकावर ना येवो अशी अपेक्षा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो .नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?