स्पर्धापरीक्षा घोटाळा माध्यमात न आलेला

                                   सध्या समस्त भारत त्यातही भारताच्या पूर्व भाग नागरिकत्वाच्या विधयेयकामुळे आगीत होरपळून जात असताना , भारताचा पश्चिम भागही वेगळ्या एका कारणांमुळे तरुणाईचा रोषाला बळी पडत आहे . पश्चिम भागातील तरुणाईचा रोषाला कारणीभूत आहे , एका राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या एका परीक्षेत झालेला अभूतपूर्व गोंधळ, ज्यामुळे ती परीक्षाच अखेर रद्द करण्याची वेळ त्या राज्य लोकसेवा आयोगावर आलेली आहे . या निमित्याने सर्वच राज्य लोकसेवा आयोगाचा  कार्यपद्धतीचा एकंदरीत आढावा घेतला असता येणारे चित्र फारसे समाधानकारक नाही असे खेदाने म्हणावे लागेल .
                   मित्रानो , भारतीय संविधानाच्या कलम 317 मध्ये या राज्य लोकसेवा आयोग प्रणालीचा  स्पष्ट उल्लेख करण्यात आला असताना , त्यांची दुर्दशा होणे वाईट आहे . वेळेवर परीक्षा न होणे , परीक्षेचा निकाल वेळेवर न लागणे , लोकसेवा आयोगाकडून निवडण्यात आलेल्या उमेदवारांना सरकारकडून नियुक्तीपत्र न मिळणे . परीक्षेत विचारलेल्या बहुपर्यायी प्रश्नाची पुनरावृत्ती होणे , बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराबाबत परीक्षार्थी आणि लोकसेवा आयोगाबाबत मतभिन्नता असणे . हे प्रकार राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नियमित झाले आहेत .  ग्रामीण भागातील अनेक गरीब विद्यार्थी सरकारी सेवेत जाण्याचे स्वप्न बघून या सेवेसाठी जीवापाड परीश्रम घेतात  . अधिकारी बनून आपल्या भागाचा विकास करण्याचा स्वप्न त्याच्यासोबत असते त्यांना होणार त्रास मुख्य माध्यमांमध्ये फारशा चर्चिला जात नाही . आणि ते राज्य जर गुजरात सारखे महतवाच्या लोकप्रतिनिधींचे असेल तर विचारायलाच नको .
            आताही हा प्रश्न फारशा चर्चेत न येण्याचे कारण हा प्रश्न गुजरात लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या बिन सचिवालय या परीक्षेसंदर्भात आहे  महाराष्ट्रातील मंत्रालय  सहाय्य्क या पदाच्या समकक्ष हे पद
आहे या परीक्षेमार्फत गुजरात मध्ये विविध ठिकाणी लिपिक , कारकून यांची भरती करण्यात येणार होती . जेव्हा गुजरात लोकसेवा आयोगामार्फत याची जाहिरात प्रसिद्ध करण्या त आली त्या मध्ये यासाठी बारावी पास ही  अर्हता ठेवण्यात आली होती  जी परीक्षेचे अर्ज भरून देण्याची मुदत संपल्यानंतर अचानक पदवी करण्यात आली .यावर गुजरात मधील काही माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर ती परत बारावी करण्यात आली परीक्षेसाठी  ठरवलेल्या दिनांकापेक्षा ही परीक्षा सात ते आठ महिन्यापेक्षा विलंबाने ती घेण्यात आली . जेव्हा ही परीक्षा घेण्यात आली . त्यावेळस काही केंद्रावर प्रश्नपत्रिका वेळेआधीच फुटणे , काही केंद्रावर खुलेआम कॉपी सारखे प्रकार घडल्याचे लक्षात आल्याने यावर प्रचंड वादंग उठले , अखेर गुजरात राज्य लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षाच अखेर रद्द करण्यात आली . आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचे वृत्त ABP अस्मिता या वृत्त वाहिनेने दिले आहे .
पूर्वी देखील मध्यप्रदेश मध्ये व्यापम परीक्षेमध्ये खूप गोंधळ झाला होता . अनेकांचे बळी  घेतल्यावर त्याची थोडीफार चौकशी झाली . आता त्याची स्थिती काय आहे कोणास ठाऊक ? अश्या परीक्षांमध्ये भरडली जाते ती तरुणाई .तरुणाई आपल्या आयुष्यतील मोक्याचे क्षण यासाठी खर्च पडते . मात्र उत्तर म्हणून त्यांना मिळते काय शून्यहे चित्र बदलायलाच हवे .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?