टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण ? सायरस मिस्त्री की अन्य कोणी ?

                           सध्या देशाचा पूर्व भाग नागरिकत्वाचा विधेयकावरून आणि गुजरात राज्य,  गुजरात लोकसेवा आयोगाचा कार्यप्रणालीमुळे धुमसत असतान,   भारतालीच नव्हे तर जगातील एक मोठा उद्योगसमूह असणारा टाटा उद्योगसमूहाच्या उत्तराधिकाऱ्यांच्या बाबतीत आलेल्या एका बातमीने भारताच्या आर्थिक विश्वात नव्याने वादळाला प्रारंभ केला . ही बातमी होती टाटा उद्योगसमूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा एकदा सायरस मिस्त्री यांची नेमणूक करण्याचा नॅशनल कंपनी लॉ अँप्लिकेन्ट ट्रिब्यूनन ने दिलेला निर्णय . यामुळे टाटा उद्योगसमूहातील सन 2016पासून सुरु असलेल्या  वादाने नवीन वळण घेतले आहे . 
                                                                      मित्रानो मिठापासून ते  सोने,  घड्याळ , केबल टीव्ही ऑपरेटर , वाहन उद्योग , हॉटेल आदी आपल्या सर्वांच्या आयुष्यतील अनेक गोष्टींचे उत्पादन  अथवा विविध प्रकारच्या सेवा  या टाटा उदयॊगसमूहाकडून  आपण घेत असतो . 151 वर्षे जुना असलेल्या या उद्योगसमूहाच्याउत्पादन  आणि सेवांचा विस्तार  जगातील सुमारे 100 देशात झाला आहे .टाटा उद्योगसमूह टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पटिल आदी संस्थांच्या मार्फ़त
समाजसेवा देखील मोठ्या प्रमाणत करतो , तेही  खूप पूर्वीपासून . केंद्र सरकारचा सीएसआर बाबत कोणताही निर्णय झालेला नसतानाच्या काळापासून टाटा समूह समाजसेवा करत आहे . अश्या या मोठ्या उद्योगसमूहाच्या उत्तराधिकारी कोण ? यावरून  नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनन मध्ये  खटला चालू होता होता त्याचा सर्वोच्च प्राधिकरणाने सायरस मिस्त्री यांची  समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा एकदा नेमणूक करण्याचा निर्णय दिला . आणि हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला . 
           सन 2012मध्ये वयाच्या 75व्या वर्षी आपला सावत्र भाऊ नोवल टाटा यांच्याऐवजी त्यावेळच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाच्या वारसदार म्हणून टाटा उद्योगसमूहामध्ये  दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी (18%) {पहिल्या क्रमांकांची भागीदारी अर्थातच टाटा सन्स या ट्रस्टची }असणाऱ्या शापूरजी पामजीवाला  या मुख्यतः बांधकाम क्षेत्र कार्यरत असणाऱ्या कंपनीच्या मालकाच्या दोन क्रमांकाच्या मुलाची निवड केली . तेच या वादाशी कारणीभूत ठरणारे सायरस मिस्त्री . 
    सायरस मिस्त्री यांनी उद्योगसमूहाच्या वाढीसाठी घेतलेले काही निर्णय उद्योगसमूहाच्या व्यावसाईक मूल्यांशी विसंगत आहेत या मुद्यावरून रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात बेनबनाव झाला . आपले कंपनीतील शेअर्सचे मूल्य लक्षात घेऊन रतन टाटा यांनी त्याच्या वापर करत सायरस मिस्त्री याना  कंपनींच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून काढून टाकले आणि या वादाला सुरवात झाली . या निर्णयाविरुद्ध सायरस मिस्त्री यांनी     नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनमध्ये दाद मागितली ट्रिब्युनने त्यांच्या विरोधात निकाल दिला त्यामुळे असंतुष्ट होत त्याच्या विरुद्ध नॅशनल कंपनी लॉ अँप्लिकेन्ट ट्रिब्यूनन कडे  दाद मागितली ज्याचा निर्णय 18डिसेंबर 2019ला सायरस मिस्त्री यांच्या बाजूने आला  ट्रिब्यूननने या निकलाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी टाटा उद्योगसमूहाला 4आठवड्याचा वेळ दिला आहे . या वेळात उद्योगसमूह जर न्यायालयात गेला नाही तर सायरस मिस्त्री पुन्हा एकदा टाटा उद्योगसमूहात सूत्रे हाती घेतील  सध्या टाटा उद्योगसमूहात चंद्रशेखर हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे . मात्र हि नियुक्ती ट्रिब्यूनन ने अयोग्य ठरवली आहे . त्याची जागा रतन टाटा यांच्या सावत्र भावाकडे अर्थात नोवाल टाटा यांच्याकडे सूत्रे जाऊ शकतात अर्थात या मध्ये काय घडामोडी घडतात हे बघणे उत्सुकतेचे ठरेल यात शंका नाही . मी यातील घडामोडी वेळच्या वेळी देतच राहील तूर्तास इथेच थांबतो , नाम्स्कार.
        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?