सृष्टीचा विलोभनीय चमत्कार सूर्यग्रहण

         मित्रानो , येत्या गुरुवारी अर्थात 26 डिसेंबर 2019 ला आपल्या भारतात सृष्टीचा विलोभनीय चमत्कार  अर्थात सूर्यग्रहण होणार आहे .  हे ग्रहण कोणत्या प्रदेशात दिसणार आहे . हे आपण बाजूच्या नकाश्यात बघू शकता . मित्रानो हे  ग्रहण भारतातील केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचा अपवाद वगळता सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे . तर केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कंकणाकृती दिसणार आहे त्यामुळे पूर्ण सूर्यग्रहणात दिसते , त्या प्रकारचे नाट्य या वेळी दिसणार नसले तरी हा सृष्टीचा चमत्कार  आपण बघायलाच हवा . मात्र चंद्रग्रहण आपण ज्या प्रकारे उघड्या डोळ्याने बघू शकतो . तसे ना होता , योग्य ती काळजी घेऊन अर्थात विशिष्ट प्रकारचे चष्मे वापरून हे नाट्य बघायला हवे . जर उघड्या डोळ्याने बघितल्यास डोळ्याला जबर हानी होऊ शकते
                                           हे नाट्य सुरु होईल, भारतीय   प्रमाणवेळेनुसार सकाळी 8वाजून 4 मिनिटांनी,  तर
याची सर्वोच्च स्थिती सकाळी 9वाजून 22मिनिटांनी असेल , आणि हे नाट्य संपेल, सकाळी 10वाजून
55मिनिटांनी .  या नंतर आपल्या भारतात सूर्यग्रहण  दिसण्यासाठी  21 जून 2020  पर्यंत वाट बघावी  लागेल, आणि  तेव्हाही फक्त उत्तर  भारतात सूर्यग्रहण दिसू शकेल . तेव्हाचे सूर्यग्रहण कंकणाकृती असणार आहे .
                  मित्रानो , सूर्यग्रहण बघणे यात अशुभ असे काहीच नाही . सूर्यावर हेलियम हे मूलद्रव्य आहे आणि आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांत खरा आहे , हे सूर्यग्रहणा दरम्यानच आपणस समजले होते . पूर्वी विज्ञान प्रगत नसल्याने हे बघू नये असे सांगितले गेले , मात्र जसजसे विज्ञान प्रगत होत गेले तसतसे  यातील भय मागे पडू लागले . मी स्वतः माझ्या राशीला ग्रहण बघणे अशुभ आहे असे सांगितले असताना देखील ग्रहण बघितले आहे . मला काहीही झालेले नाही तरी हा सृष्टीचा चमत्कार न चुकता बघाच . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?