शताब्दी अग्रलेख आणि कायद्याची

            आज 23 डिसेंबर 2019 ,आजच्याच दिवशी 100 वर्षापुर्वी म्हणजेच 23 डिसेंबर 1919ला भारतात एक वादळ उठले होते, या वादळाचे नाव होते माँटेग्स्यु -चेम्सफर्ड लाँ . याच कायद्याविरोधात लोकमान्य टिळकांनी त्यांचा "उजाडले पण सुर्य कुठे आहे " हा सुप्रसिद्ध अग्रलेख लिहला होता .त्या घटनेला आज 100 वर्ष पुर्ण होउन 101वे वर्ष सुरु झाले . मित्रांनो ही एक ऐतिहासिक घटना आहे .मात्र या घटनेची म्हणावी अशी    दखल घेण्यात आली नाही ,असे माझे निरीक्षण आहे, असो
                सन 1909 मध्ये  भारतीय नागरीकांना घटनेचा सुधारीत भाग दर दहा वर्षांनी देण्याचे ठरले त्यानुसार देण्यात आलेल्या या सुधारणा .पहिल्यांदा  देण्यात आल्या त्या मार्ले मिंटो सुधारणा .नंतरचा सुधारणा या माँटेक्स्यु चेस्मफर्ड सुधारणा त्यातील माँंटेक्स्यु हा भारतमंत्री तर चेस्मफर्ड हा व्हाँइसराँय होता .या दोघांनी एकत्रीत केलेला सुधारणेचा मसुदा म्हणजे माँटेक्स्यु चेमस्फर्ड सुधारणा . या नंतर देण्यात आलेल्या सुधारणा म्हणजे सायमन कमिशन .
                  या माँटेक्स्यु चेम्सफर्ड सुधारणांवरच टिका करणारा अग्रलेख लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये लिहला तो म्हणजे "उजाडले पण सुर्य कुठे आहे?"  मित्रांनो जे विद्यार्थी पत्रकारीतेचा कोर्स करतात.त्यांना अग्रलेखाविषयी सांगताना नेहमीच या "उजाडले पण सुर्यं कुठे आहे ?"  या अग्रलेखाचा संदर्भ देण्यात येतो . मराठीतील अग्रलेखनाचा मापदंड म्हणून या अग्रलेखाकडे बघीतले जाते . निर्भयतेने ,करारीपणाने करावयाचे लेखन म्हणून या अग्रलेखाकडे बघीतले जाते. आज अनेक माध्यमे सरकारधार्जिणी भुमिका घेतात, म्हणून टिका करण्यात येते, त्या पार्श्वभुमीवर ब्रिटिश सत्तेचा अमंल असताना सरकारविरोधी ठाम भुमिका घेउन ती राबवणे खरोखरच अभिमानास्पद आहे .नखे नसणारा वाघ असाही सुर या कायद्याबाबत आळवलेला आपणास दिसतो .                                                                                भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून या कायद्याकडे बघावे लागेल. या कायद्यान्वये मुस्लीम बांधवाना स्वतंत्र्य मतदार संघ देण्यात आले . या मतदार संघातील उमेदवार आणि मतदार मुस्लीम बांधवच असणार होते .सध्याच्या आरक्षीत मतदारसंघात उमेदवार आरक्षीत गटाचा असला तरी मतदार त्या मतदार संघातील सर्व लोक असतात . कायद्यान्वेयच राज्याच्या विधीमंडळात विधानपरीषद आणि विधानसभा अशी दोन सभागृहे निर्माण करण्यात आली . अश्या  या कायद्याला 100 वर्ष आजच्या दिवशी पुर्ण झाले . या विषयी खुप काही बोलता येवू शकते .मात्र हे समाज माध्यमांवरील लेखन आहे . यास शब्द मर्यादा असते. वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे हे पानेचा पाने करता येत नाही, म्हणून ईथेच थांबतो , नमस्कार  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?