मूळ मुद्यांकडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना ?

   
 सध्या आपल्या भारतामध्ये अनेक जीवनावश्यक प्रश्न सोडवणे अत्यंत  तातडीचे झाले असताना , विविध लोकांकडून सध्याच्या परिस्थितीसी अत्यंत विसंगत मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे . या मुद्द्यांमध्ये महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचे नामविस्तार करण्याचे , तसेच अन्य देशातील काही समाजघटकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे विधेयक या मुद्यांचा समावेश करावा लागेल . विद्यापीठाच्या नामविस्तार करण्याच्या ऐवजी ते विद्यापीठ जागतिक पातळीवर  गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल कसे होईल ? याबाबत कार्यवाही करणे आवश्यक होते . अन्य देशातील अत्याचार सहन करणाऱ्या समाज घटकांविषयी माझी सहानभूती आहेच,  मात्र देशातील अनेक घटक हलाखीचे जीवन जगत असताना  त्यांचे जीवन सुधारणे हे प्रथम कर्तव्य असायला हवे .
                               सध्या भारताची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक स्थितीत आहे . त्याविषयी उचलण्यात येणारी पाऊले पुरेशी नाहीत . अधिक पाऊले उचलण्यात येण्याची गरज आहे . भारतातील शिक्षणव्यवस्था अत्यंत धोकादायक स्थितीत आहे . प्रथम आणि असर या स्वयंसेवी संस्थेमार्फत शिक्षणाचे चित्र वारंवार समोर येत असतेच .  काही दिवसापूर्वी भारतातील कंपन्यांना प्रशिक्षित मनुष्यबळ प्राप्त होत नसल्याने भारतात गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी असल्याची बातमी आली होती . रेल्वे, बीएसएनएल , इंडियन ऑइल , एअर इंडिया सारख्या सरकारी कंपन्या प्रचंड तोट्यात आहे  त्याविषयी कार्यवाही करण्यात येणे आवश्यक होते . मात्र या विषयी देशभरात सखोल विचारमंथन होणे आवश्यक असताना देशात नको त्याच विषयावर देशातील वातावरण ढवळून निघत आहे . 
        सध्या जगात  युनाटेड किंग्डम सारख्या अनेक देशात निवडणुका होत आहेत . त्या देशांमध्ये कोणत्या मुद्यांवर निवडणुका होतात ,याचा आढावा घेतल्यास आपणास सहज लक्षात येते की , हवामान बदल हा मुद्दा त्या निवडणुकांमध्ये प्रमुख मुद्दा असतो . जगात हवामान बदलांमुळे सर्वाधिक हानी ही भारतीयांची होत असते . तरी सुद्दा हा मुद्दा भारतीय निवडणुकींमध्ये फारसा चर्चा केला जात नाही . 
या मुद्यांकडे सरकार बघेल अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?