भारताला ऑस्करची बाहुली कधी मिळणार ?

                  दिनांक 13जानेवारी 2020ला सायंकाळी 92व्या ऑस्करच्या विविध गटातील नामांकन जाहीर झाले . जगातील सर्वाधिक चित्रपट निर्माण करणाऱ्या भारताच्या एकाही चित्रपटाचा यात समावेश नाहीये . नाही म्हणायला माहितीपट या वर्गवारीत एक नामांकन मिळाले आहे ., हाच तो काय दिलासा . जागतिक स्तरावर
मानाचा समजल्या जाणाऱ्या ऑस्करबाबत भारताची पाटी काही अपवाद वगळता कायमच कोरी राहिली आहे . मात्र या विषयी फारसे बोलले जात नाही . त्याबाबत असणारे मौन सोडण्यासाठी आजचे लेखन .
                                      जागतिक स्तरावरील चित्रपटांचा विचार करता , भारतीय चित्रपट तंत्रज्ञानाचा विचार करता कोठेही मागे नाही . मात्र तरीही ऑस्करची बाहुली भारतीयांच्या हातात काही येत नाही , माझ्या मते यासाठी एक महत्तवाचे कारण म्हणजे व्यावसायिक स्तरावरील चित्रपटांचे विषय .  व्यावसायिक स्तरावरील  भारतीय चित्रपट हा खूपच मर्यादित विषयांवर असतात . त्याची चौकट रुंदावणे ही अत्यंत महत्त्वाचे आहे . नाही म्हणायला काही कलात्मक चित्रपट बनतात . मात्र ते बॉक्स ऑफिसवर फारसे लोकप्रिय ठरत नाहीत .
आणि भारतीय चित्रपट म्हणून जे चित्रपट ऑस्करसाठी निवडले जातात . त्यांच्या निवडीचा निकष काय असतो , ते त्या निवड समितीलाच माहिती . आणि भारताचा चित्रपट ऑस्करसाठी  परदेशी भाषा चित्रपट या वर्गवारीत स्पर्धेत उतरवला जातो . श्वास सारख्या काही चित्रपटांच्या अपवाद वगळ्ता बहुतांशी वेळेस हिंदीच चित्रपट भारताकडून या स्पर्धेसाठी पाठवण्यात येतो . दूरदर्शनवर दर शनिवारी भारतातील विविध भाषेतील
चित्रपट दाखवण्यात येतात . या चित्रपटांचा दर्जा  हिंदी चित्रपटांच्या तुलनेत सरस असल्याचे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे . मात्र ते चित्रपट का पाठवण्यात येत नाही माझ्या मते ते चित्रपट ऑस्करसाठी पाठवल्यास चित्रात नक्कीच फरक पडेल आणि जगात सर्वाधिक चित्रपट निर्माण करणाऱ्या भारताची झोळी ऑस्करच्या बाहुल्यानी सुद्धा भरून जाईल . यात कोणालाही तिळमात्र शंका नसावी न. भारतीय चित्रपट ऑस्करसाठी ज्या वर्गवारीत आपली दावेदरी सादर करतात . त्या वर्गवारीत कोणत्या देशाच्या चित्रपटांनी ऑस्करचीबाहुली मिळवली आहे  याचा मागोवा घेतल्यास आपणास त्या यादीत इराण सारखे भारताच्या तुलनेत अत्यंत छोटे देश असल्याचे आपणास दिसून येते . त्यामुळे हे चित्र बदलायलाच हवे .सध्या भारतात अनेक क्षेत्रात चांगले बदल घडत आहेत . त्याची व्याप्ती वाढत येत्या एक दोन वर्षात भारतात ऑस्करची बाहुली येवो अशी सदिच्छा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?