राष्ट्रीय भुगोल दिनाच्या निमित्याने

             
  भूगोल आपल्यापैकी अनेकांचा शालेय स्तरावरील नावडता विषय . . मात्र हा विषय आपल्या जीवनात अत्यंत उपयुक्त असणारा विषय आहे  . आपण भूगोल विषयाशी पूर्णपणे बांधली गेलो आहे . मराठवाडा हा मागास का आहे ? जागतिक राजकारणात काश्मीरचे महत्व मोठ्या प्रमाणवर का आहे ?  सिंगापूर या देशाने अल्पावधीत प्रचंड प्रगती कशी काय केली ? अश्यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही आपणस भूगोलाच्या विविध उपशाखांच्या अभ्यासाने समजतात ,
   भूगोलाच्या विविध शाखा आहेत . जसे राजकीय भूगोल( political geography  ) वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military  geography )वगैरे . मात्र शालेय  अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो . त्यामुळे अत्यंत
रंजक असणारा भूगोल विषय कंटाळवाणा होतो . आणि भूगोलाशी असणारा असणारा संपर्क तुटतो .    तो परत स्थापित व्हावा या साठी साजरा करण्यात येतो तो राष्ट्रीय हवामान दिवस . जो मकर संक्रांती च्या दिवशी साजरा करण्यात येतो . त्या निमित्याने भूगोल  विषयावर प्रेम करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा                                         छ्त्रपती शिवाजी महाराज यांची युद्धदनीती हि लष्करी भूगोलावर आधारित होती .पानिपतच्या तिसऱ्या युध्दात अब्दालीने केलेल्या चढाईत त्या भागाच्या प्राकृतिक रचनेने मोठा भाग असल्याचे आपणास सहज दिसते प्रकारुतिक रचनेचा अभ्यास हा भूगोलाशी संबंधित आहे .  आपले राजस्थानी आणि गुजराती बांधव पिढीजात व्यवसाय करू शकतात . याची करणे तेथील भौगोलिक परिस्थीशीं परिणाम साधणारी आहेत . आपल्याकडे हिवाळ्यात पक्षी येतात . याचे कारण  सुध्द्दा भूगोलाशी संबंधित आहे . सध्या  आपण अत्यंत विषम
अनुभवतो आहोत याचा सुध्द्दा अभ्यास भूगोलात करण्यात येतो कोकणातील घरे उतरत्या छपराची असतात यामागे सुध्द्दा भूगोलाच कारणीभूत असतो . मात्र शालेय  अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो . त्यामुळे अत्यंत रंजक असणारा भूगोल विषय कंटाळवाणा होतो . आणि भूगोलाशी असणारा असणारा संपर्क तुटतो .        
               हवामानशात्र(CLIMATOLOGY ) या भूगोलाच्या शाखेचा संबध वेगळा सांगायलाच नको आपण सर्व तो जाणताच भूरुपाशात्र (GEOMORPHOLOGY ) भूगर्भ शात्र (GEOLOGY ) चा वापर कोकण रेल्वे सारखे प्रकल्प तयार करताना होतो राजकीय भूगोलाचा (POLITICAL GEOGRAPHY )चा वापर परराष्ट धोरण ठरवताना होतो लोकसंख्या भूगोल (POPULATION ) व वस्ती भूगोलाचा(SETTLEMENTGEOGRAPHY)  आर्थिक भूगोलाचा (ECONOMIC GEOGRAPHY )चा उपयोग सरकारला विविध योजनांचे PLANING करता ना होतो HYDROLOGYचा वापर जलविद्युत उभारताना होतो 
     भूगोल विषय नावडता होण्यासाठी  एक घटक म्हणजे त्याची परिभाषा आपण सर्वसामान्य भाषेत ज्याला पाऊस म्हणतो त्यास भूगोलाच्या तांत्रिक भाषेत पर्जन्य म्हणतात . या परिभाषिक शब्दांमुळे  विषय क्लिष्ट होतो . नावड निर्माण होण्यामागचे  हे एक महत्त्वाचे कारण आहे 
               केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC ) कडून नागरी सेवेशिवाय (CIVIL SERVICE EXAM ) ज्या
परीक्षा घेतल्या जातात .  त्यामध्ये भूगोल विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा घेतली जाते .पुन्हा एकदा सर्वांना राष्ट्रीय भूगोल दिनाच्या शुभेच्छा . भूगोलाच्या अभ्यास या भूगोल दिनापासून सुरवात करताय ना मग 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?