नाम साधर्म्यच्या निमित्याने

                                कालचीच गोष्ट आहे. एका व्याख्यानाच्या निमित्याने मी एका सभागृहात बसलो होतो . व्याख्यान भारतीयांनी भारतीयांसाठी भारतात आयोजित केले असल्याने ते भारतीय प्रमाणवेळेनुसार सुरु होणार , हे ओघाने आलेच . व्याख्यान कोणत्या विषयाविषयी,  होते ? व्याख्यानात वक्ता काय,  बोलला? या विषयी आपणास नंतर कधीतरी सांगेल . मला तुमचे लक्ष वेधायचे आहे . ते अन्य एका मुद्यावर . तर भारतीय प्रमाणवेळेनुसार सुरु होणाऱ्या या व्याख्यानाला मी  मात्र आमंत्रण पत्रिकेवर सांगितल्याच्या दहा  मिनटे आधी आल्याने  थोडा  वेळ घालवण्यासाठी शेजारी बसलेल्या व्यक्तीशी बोलणे सुरु केले . संबंधित व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या तालुकयातील एका गावाची रहिवासी होती . मात्र संबंधित व्यक्तीने तिची ओळख सांगताना अहमदनगर अशी सांगितली . मी नुकतीच
अहमदनगर शहराला भेट दिली असल्याने , त्यांना अधिक बोलत करण्यासाठी मी तुम्ही माळवाडी परिसरातील का ? तुम्ही भिंगारला परिसरात राहता का ? तुम्ही तेली चौकात रहाता का ? असे प्रश्न विचारले . त्यावर तुम्ही ज्या भागाची नावे  घेतली ती सर्व अहमदनगर शहरातील आहेत . मी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याचा रहिवासी  आहे . मी तुम्हाला अहमदनगर सांगितले कारण मी ज्या तालुक्यातील रहिवासी आहे , त्या तालुक्याचे नाव मी घेतले की , मला लोक थेट विदर्भात पाठववतात . आमच्या अहमदनगर जिल्ह्यात अशी अजून दोन तालुक्याची गावे आहेत ज्यांचे नाव घेतले असता ऐकणारा त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात पाठवतो . (पहिले गाव अकोले आणि दुसरे कर्जत ) दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार सुरु होणारे व्याख्यान सूर झाल्याने आमच्या गप्पा मात्र खंडित झाल्या . 
               व्याख्यान संपल्यावर घरी आल्यावर देखील  त्या व्यक्तीचे बोलणे मनात रुंजी घालत होते . मी कोठेतरी वाचलंय आपल्या महाराष्ट्रात 25पिंपळगाव आहेत . त्या प्रमाणे कर्जत ,  कोकणगाव, चिखली, खेड 
सारखी गावे  किती आहेत याचा देखील सर्वे होणे गरजेचे आहे . मला अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असणारा कर्जत या तालुक्याचे मुख्यालय असणारे आणि पुणे मुंबई रेल्वेमार्गावरील अशी दोन कर्जत मला माहिती आहेत . चिखली या गावाविषयी बोलायचे झाल्यास नाशिकहून सुरतला जाताना गुजरात राज्यात एक चिखली नावाचे गाव आहे . दुसरे चिखली म्हणजे रत्नागिरीच्या जवळ असणारे लोकमान्य टिळकांचा  जन्म झाला ते चिखली . कोल्हापूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर देखील कोल्हापूर  जिल्ह्यात  मलकापूर नावाचे एक गाव आहे . दुसरे संत गजानन महाराज
यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शेगाव या गावाच्या जवळ असणारे मलकापूर 
               अशी नाम साधर्म्य असणारी अनेक गावे असतीलच . या नाम साधर्म्य असणाऱ्या गा गावांच्या सर्वे झाला तर अनेक रंजक बाबी समोर येतील हे नक्की . या प्रत्येक गावाचा असे नाव असण्यामागे काहीतरी पार्श्वभूमी असणारच . ती पण या निमित्याने समोर येईल. सारखे नाव असणाऱ्या गावांच्या इतिहास देखील सारखा आहे का ? याचा पण यानिमित्याने उलगडा होईल . असे मला वाटते ? , आपणस काय वाटते ? या विषयी बरेच काही बोलता येऊ शकते . मात्र हे समज माध्यमांवरील लेखन आहे . बहुसंख्य लोक समाज माध्यमे मोबाईलवर वाचतात . त्यामुळे याला विस्ताराची मर्यादा आहे . त्यामुळे इथेच थांबतो . मात्र या खाली आपले मत देयला विसरू नका . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?