अन्य राज्य परिवहन महामंडळ आणि आपली MSRTC

                    नुकताच काही अपरिहार्य कारणास्तव महाराष्ट्राची एसटी बस सोडून प्रत्येकी एकदा  कर्नाटक आणि गुजरात राज्यच्या एसटी बसने प्रवास करावा लागला . या प्रवाश्यादरम्यान मला वाढलेली गोष्ट म्हणजे संबंधित राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची रचना . .आपल्या महाराष्ट्राच्या बसेसपेक्षा कर्नाटकाच्या बसेस लांबीने थोड्या मोठ्या होत्या . तसेच त्या बसेसमध्ये एका रांगेत 5आसने होती . गुजरातची एसटी आपल्या महाराष्ट्र्राच्या बसेसपेक्षा लांब नव्हती याही बसमध्येएका रांगेत 5आसने होती . आपल्या महाराष्ट्राच्या बसेसमध्ये पूर्र्वी 5आसने होती . मात्र कालांतराने आरामदायी प्रवाश्यांचा प्रवास आरामदायी करण्याच्या हेतून आपल्या बसेस मध्ये एका रांगेत फक्त 4असणे ठेवण्यात येऊ लागली . मात्र या बसेसमध्ये अजून एका रांगेत पाच आसने आहेत . आपली आसने
कमी का करण्यात आली ? पूर्वीप्रमाणे एका रांगेत पाच आसने असावीत . यासाठी मी एसटीच्या एका अधिकाऱ्याशी  नंतर संवाद साधला असता त्याने आपली भौगोलिक परिस्थिती कर्नाटक आणि गुजरात पेक्षा भिन्न असल्याने ते शक्य नसल्याचे सांगितले . जे मला कदापि मान्य नाही . आणि ते का अमान्य आहे हे सांगण्यासाठी आजचे लेखन .
            माझ्या मते ज्या प्रमाणे आपल्या राज्य परिवहन महामंडळाची अश्वमेध ही सेवा फक्त पुणे ते मुंबई या एका मार्गावर सीमित करण्यात आली आहे . त्या पद्धतीने  भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम असा प्रदेश वगळता . अन्यत्र पुन्हा एकदा एका रांगेत पाच
असणारी व्यवस्था सुरु करणे अत्यावश्यक आहे . आपल्या सभोवताली असणाऱ्या राज्यांचा विचार केला असता गोव्याचा कदंब ट्रान्सपोर्ट चा अपवाद वगळता अन्य सर्व राज्य परिवहम महामंडळे म्हणजेच गुजरात , मध्येप्रदेश, कर्नाटक , तेलंगणा या सर्व राज्यांमध्ये एका रांगेत पाच आसने असणाऱ्या बसेस चालवतात . मग महाराष्ट्राने पूर्वीची आसन व्यवस्था का अंगिकारू नये ?  रांगेतील एक आसन कमी केल्याने अथवा वाढवल्याने जर प्रवास आरामदायी होत असेल ? यावर माझा विश्वास नाही . कारण अन्य परिवहन महामंडळे अजूनही जुन्याच पद्धतींच्या बसेस वापरत आहेत . जर रांगेतील आसने कमी केल्यावर जर आरामदायी प्रवास होत असेल तर मग अन्य राज्य परिवहन महामंडळांनी तो कित्ता का गिरवला नाही . 
माझ्यामते यामुळे एका बसेस मधील प्रवाशी संख्या सुमारे 20%वाढल्याने महामंडळाच्या बसेसवरील
आस्थापना खर्च कमी होईल , परिणामी महामंडळ नफ्यात येण्यास हातभार लागेल . प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात . माझी बाजू काही जणांना आवडणार नाही . त्यांचेही मी स्वागत करतो . कारण माझी मते आणि त्यांची मते यांच्या घुसमळीतून अखेर आपल्या एसटीचेच भले होणार आहे . जे आपल्या सर्वांचे अंतिम ध्येय आहे . तर मग चला आपल्या एसटीचे हात बळकट करूया .

     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?