वर्षपुर्ती वंदे भारतची

       
         दिनांक 15फेब्रुवारी 2015रोजी भारतीय रेल्वेत एक नवा अध्याय लिहला गेला . पुर्णतः स्वदेशी बनावटीची, अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त आणि तब्बल 160किमी प्रती तास या वेगाने धावू शकणारी वंदे भारत एक्सप्रेस याच दिवशी भारतीय रेल्वेत दाखल झाली .आज हा लेख लिहीत असताना त्यास एक वर्ष पुर्ण झाले आहे . या एका वर्षात भारतीय रेल्वे फक्त वंदे भारत एक्सप्रेसवरच थांबली नाही , प्रवाश्यांना पाश्चात्य देशातील रेल्वेसेवीची अनुभती यावी या हेतूने अनेक पावले या कालावधीत उचलली गेली .ज्यामध्ये डिझेल आणि इलेक्टीसिटी या दोन्हीवर चालू शकणाऱ्या इंजिनाची स्वदेशीचा पद्धतीने निर्मिती, रेल्वेच्या महसुलात सर्वाधिक वाटा उचलणाऱ्या मालवाहतूकीसाठी मुंबई सुरत दिल्ली आणि कोलकात्ता दिल्ली या मार्गावर स्वतंत्र्य मार्गिकेच्या कामाला देण्यात आलेली गती, त्याचप्रमाणे, जर अपघात झाल्यास एकमेकांवर न चढणाऱ्या, प्रवासा दरम्यान प्रवाश्यांना धक्के विरहीत अनुभव देणाऱ्या , पारंपारीक डब्यांचा तूलनेत कमी आवाज करणाऱ्या LHB  डब्यांच्या निर्मितीला दिलेला वेग या प्रमुख गोष्टी म्हणता येईल.
                              भारतीय रेल्वे अत्यंत जलद गतीने  प्रगतीची नवनविन शिखरे पादाक्रांत करत असल्याचे हे लक्षण आहे. 3फेब्रुवारी 1925ला भारतातील पहिली इलेक्ट्रीक रेल्वे मुंबईत धावल्यानंतर भारतात रेल्वेचा विस्तार प्रामुख्याने किलोमीटरच्या प्रमाणात होत असला तरी गुणात्मदृष्ट्या तिचा फारसा विकास झालेला आपणास दिसत नव्हता, तो आता दिसत आहे .जगात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन देणारा सार्वजनिक उपक्रम , आँस्टोलिया या देशाच्या एकुण लोकसंख्येएव्हढ्या प्रवासांची दररोज वाहतूक करणारा, विस्ताराच्या बाबत जगातील चवथ्या क्रमांकाची रेल्वे असा किताब मिळालेली आपली भारतीय रेल्वे मात्र
आधुनिकीकरणाबाबत मात्र काहीसी मागे पडली होती .तीही कमतरता आता दुर होत आहे . जगात  300  किमी प्रतीतास वेगाने रेल्वे धावत असताना आपली भारतीय रेल्वे सरासरी 40ते 50 किमी प्रतीतास या वेगाने धावत असे .त्यामुळे अवाढव्य मात्र सुस्त वाटणारी आपली भारतीय रेल्वे आता कात टाकत आहे .आपली भारतीय रेल्वेने विकासाबाबत पकडलेली ही गती उत्तरोत्तर वाढत जावो, असी मनोकामना व्यक्त करुन सध्यापुरती आपली रजा घेतो .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?