वंदन बाँलीवूडच्या पित्याला

                                       16फेब्रुवारी 1946 ही फक्त एक तारीख नाहीये . आज कोट्यावधीचा व्यवसाय बनलेल्या बाँलीवूडचा जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या निधनाची तारीख आहे ही . मी हा लेख लिहीत असताना 2020या वर्षी  गोष्टीला 74 वर्षे पुर्ण होउन 75वे वर्ष  सुरु झाले आहे . या 75वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे . मला त्यात पडायचे नाही , त्यात पडण्याची माझी बौद्धीक क्षमता देखील नाही . मला तूमचे लक्ष वेधायचे आहे . आपण महाराष्ट्रीयन हा वारसा कोणत्या प्रकारे जतन करतोय या कडे .  मराठीतील एक अजरामर लेखक श्री . पु. ल देशपांडे यांच्या अपुर्वाई या प्रवासवर्णनात  400 वर्ष जून्या असणाऱ्या शेक्सप्रिययरच्या घराचे जतन केल्याचा उल्लेख आहे . त्या तूलनेत आपला कालावधी फारसा नाही . मात्र आपण दादासाहेब फाळके यांचा कोणता वारसा जतन केला आहे ?असा विचार करता समोर येणारे चित्र फारसे समाधानकारक नाही .
                      त्र्यंबकेश्वर येथील कुशार्वता शेजारील एका गल्लीत त्यांचे घर आहे, असे म्हणतात . मी त्या
ठिकाणी हे समजल्यापासून दोन तीनदा गेलो आहे .पुण्यात काही ठिकाणी ज्या प्रमाणे काही घरांवर या ठिकाणी हे रहात होते ,अस्या पाट्या दिसतात .त्या प्रमाणे मला एकही पाटी पण दिसली नाहीये.कोणाला माहिती असल्यास त्यांनी या ब्लॉग पोस्टचा खाली सांगावे, माझ्या ज्ञानात भर पडल्याने मला आनंदच होईल. मी रहातो त्या नाशिकमध्ये त्यांचा नावाने एक स्मारक आहे, हीच ती काय आनंदाची गोष्ट .त्यांचे चरीत्र युट्युब या समाज माध्यमांवर ऐकत असताना ते काही काळ नाशिकला असल्याचे समजले . मात्र कवीवर्य कुसुमाग्रजांसारखे त्याचे निवास सुप्रसिद्ध का नाही?हे मला तरी समजत नाही .
                    नाही म्हणायला , त्यांचा कार्यावर आधारीत "हरीशचंद्राची फँक्टरी "हा चित्रपट आहे . मात्र  स्मारक जिवंत असले तर त्यात मज्जा असते , असे मला वाटते . त्यांचे जिवंत स्मारक हे चित्रपटातून नव्हे, तर ते ज्या ठिकाणी वास्तव्यास होते , त्या ठिकाणाचे ऐताहासिक स्वरूप ठेवून होते, असे मला वाटते . यावर मतमतांतरे असू शकतात , याची मला जाणीव आहे. आपल्या मत़ाचे स्वागतच आहे .   दासाहेब फाळके यांच्या नावे जरी भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचे समजले पुरस्कार देण्यात येत असले तरी त्याहुन अधिक होणे अत्यावश्यक आहे .माझ्या माहितीनुसार फाळके यांनी 1913ते 1937 पर्यंत चित्रपट निर्मिती केली . वर्षांमध्ये मोजल्यास हा कालावधी तब्बल 24वर्षे आहे . गंगावतरण हा त्यांचा अखेरचा चित्रपट , जो त्यांनी निर्माण केलेला एकमेव बोलपट देखील आहे .त्यांच्या स्मृती दिनी त्यांंना मानाचा मुजरा करुन सध्यापुरतो थांबतो 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?