नावात काय आहे ?


       नावात काय आहे ,असे सुप्ररसिद्ध इंग्ररजी साहित्ययीक शेक्सपियर यांचे विधान आहे. मात्र सदर विधान करतांना शेक्सपियर यांनी सन 2020मध्ये भारतात येणाऱ्या शिक्षणतज्ञांचा विचार बहुधा केला नसावा,कारण त्यांनी जर असा विचार केला असता , तर खचितच त्यांनी असे विधान केले असते. कारण सन 2020 मधील भारतातील शिक्षणतज्ञांनी शेक्सपियरला खोटे पाडणारे संशोधन केले आहे .नापास या शद्बामुळे विद्यार्थ्यांचा मनात भिती बसते , सब   नावात काय आहे? असे इंग्रजीतील सुप्रसिद्ध साहित्यीकब त्यांना नापास न म्हणता कँपिसिटिबल म्हणावे, असा आदेश.सिबिएससी च्या शिक्षणतज्ञांनी काढला आहे . मात्र मुळात अभ्यासात कमकुवत असणारे विद्यार्थी अभ्यासात भक्कम बनतील याबाबत कोणती कार्यवाही करण्यात यावी, याबाबत त्यांनी सोईस्कर मौन धारण केले आहे . अभ्यासात एखादा विषय कमकुवत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे न शिकवता अन्य कोणती पद्धत वापरता येवू शकते ?याबाबत त्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे .त्यांना काही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास मनाई करुन एक प्रकारे त्यांना विषमतेचीच वागणूक दिली आहे .त्यामुळे सर्वसाधरण आणि अशी विषमतेची वागणूक मिळणारे विद्यार्थी असी विभागणी होवून मुळ प्रश्न.कायम रहातोय .या दुय्यम वागणूक मिळत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील संधीत तो विषय सोडवावा लागणार आहे .
                                    विद्यार्थ्यांचे मुल्यमापन एकाच परीक्षेतून करणे गैर आहे, त्यांना एकापेक्षा जास्त संधी मिळायलाच हव्यात , हा विचार यामागे मांडण्यात आला आहे .जो योग्य असला तरी माझ्यामते यासाठी शोधण्यात आलेला उपाय अयोग्य आहे . हा उपाय शोधणाऱ्यांंनी कदाचित स्पर्धापरीक्षेत विचारला जाणारा cause and effect  हा प्रश्नप्रकार कधीच अभ्यासला नसावा ,असे समजण्यास त्यामुळे वाव मिळतोय.आजच्या विद्यार्थ्यांना उद्याचे देशाचे भवितव्य म्हणायचे मात्र असा प्रकारे त्यांच्याशी खेळायचे हे सर्वथा अयोग्य आहे .हा प्रकार थांबून प्रश्नाचा मुळाशी जावून हा प्रश्न सोडवायला हवा , आणि ते नजिकच्या भविष्यकाळात सहजतेने होईल असी इश्वरचरणी प्रार्थना करुन आजपुरतो थांबतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?