मराठी दिन विशेष

                 आपल्या भारतात,  महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देणारे पहिले राज्य , समस्त भारतातला रोजगार हमी योजनेची ओळख करून देणारे राज्य , भारताला सहकाराची ओळख करून देणारे राज्य , महिलांना  शिक्षण देण्याची सुरवात करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे . आणि अश्या प्रतगशील विचाराच्या राज्याची राज्यभाषा म्हणून मराठीची ओळख आहे .. जगातील 15 कोटी लोकसंख्येची मातृभाषा असणाऱ्या या मराठी भाषेत नवनवीन विषयावरचे , आधुनिक ज्ञान यावे , मराठीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी ,
यावर काय करावे?  या बाबत गाठायचा आहे विचारमंथन करणे सोपे व्हावे या उद्देश्याने योजलेला दिन म्हणजे जागतिक मराठी दिन जो 27 फेब्रुवारी रोजी असतो . या दिनानिमित्य समस्त मराठी जनतेला खूप खूप शुभेच्छा .
                  हा लेख लिहीत असताना म्हणजेच 26 फेब्रुवारी2020 रोजी मराठीची सद्यस्थिती काय आहे ? आतापर्यंत मराठीच्या उन्नतीसाठी कोणकोणती पाऊले उचलण्यात आली ? आणि याची फलनिश्चिती काय ? याचा मागोवा घेतल्यास येणारे चित्र फारसे आशादायक नाही , असे खेदाने म्हणावे लागते आहे . नाही म्हणायला महाराष्ट्रातील सर्व बोर्डांच्या आणि  शाळेत माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय विधानपरिषदेत मंजूर करण्यात आला आहे . ही अत्यंत समाधानाची बाब आहे . मात्र अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे याचे आपणास भान असणे अत्यावश्यक आहे .. मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ हा विषय लवकरत लवकर मार्गी लागणे अत्यावश्यक आहे . त्याच प्रमाणे अधिकाधिक विज्ञान विषयाचे ज्ञान सर्वसामाम्य लोकांना समजेल अश्या मराठीत येणे ही  कार्य होणे सुद्धा आवश्यक आहे . त्याशिवाय  मराठी ज्ञानभाषा बनणे अवघड आहे . सध्याच्या तंत्रज्ञानाचा काळात कोणत्याही भाषेच्या विकासासाठी त्या भाषेला किती वर्षाचा इतिहास आहे ? ती भाषा किती लोकांची मातृभाषा आहे ? त्यामध्ये किती प्रमाणात साहित्य निर्मिती होते ? या पेक्षा त्या भाषेत किती प्रमाणात ज्ञान निर्माण होते याला महत्व आहे . याचा विचार केला असता मराठीत खूप कार्य करणे आवश्यक असल्याचे सहज लक्षात येते . अर्थात मराठीमध्ये सध्या पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात ज्ञान निर्मिती होत आहे , जी बाब खूप चांगली आहे  याची गती दिवसोंदिवस वाढत जावी अशी सदिच्छा व्यक्त करून सध्यापुरते  थांबतो . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?