यात्रिगण कृपया ध्यान दे ........

         
"यात्रिगण कृपया ध्यान दे ट्रेन नंबर 123456 सोयीसुविधा एक्सप्रेस थोडीही देर मै प्लेटफ्रॉम क्रमांक दों पर आनेवाले है !", अश्या प्रकारचा उद्घोषणा आपण रेल्वेस्टेशनवर अनेकदा ऐकतो . मात्र लवकरच त्याचे स्वरूप बदलले जाण्याची नितांत शक्यता आहे . आणि त्याला कारणीभूत ठरणार आहे . केंद्र सरकारचा रेल्वेबाबतचा एक निर्यय . रेल्वेच्या साधन सामुग्रीचा वापर करत खाजगी उद्योजकांना आपली स्वतःची रेल्वेसेवा सुरु करू देण्याचा निर्णय .  कदाचित त्यामुळे आपणास सुपरिचित  असलेली उद्घोषणा "May have attentions  pleas , train number  123456 "Suwidha Express will be arrived on platform number 2 . या उद्घोषणेमध्ये खाजगी रेल्वे चालकांचा समावेश होऊ शकतो . त्यामुळे सध्या ज्या प्रमाणे विमान प्रवास होतो , त्याप्रमाणे नागरी हवाई प्राधिकरणाच्या मार्फत उभारण्यात आलेल्या विमानतळ आणि अन्य सोइ सुविधा
वापरत खाजगी विमान कंपन्या सेवा देतात तसे चित्र उभे राहू शकेल .यामुळे भारतीय रेल्वेचा तोटा भरून निघून सध्या प्रचंड तोट्यात असंलेली भारतीय रेल्वे नफ्यात येईल असे कारण सरकारतर्फे देण्यात येत आहे . सरकारतर्फे या बाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात याची सर्वस्वी जवाबदार खाजगी चालकाची असेल असे सांगण्यात येत असले तरी या रेल्वे ज्या रुळांवर धावणार आहेत ते रूळ , त्या रेल्वे चालवायला लागणारा विद्यत प्रवाह  मात्र रेल्वेच्या तारांमधूनच जाणार आहे .  याबाबत कोणतेही स्पष्टीकरण ला लेख लिहीत असताना सरकारकडून देण्यात आलेले नाही .
               मला व्यक्तिशः बोलायचे झाल्यास हा निर्णय पटलेला नाही . माझ्यामते याच्या शिवाय अनेकमार्ग  होते रेल्वे नफ्यात आणायचे . ज्यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अवाजवी सवलती बंद करणे .
रेल्वेतर्फे लोकल्याण या सबबीखाली रेलनीर सारखे प्रकल्प राबवले जातात त्याच प्रमाणे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दवखाने शाळा आदी गोष्टी चालवल्या जातात . त्यांचा आढावा घेऊन योग्य नसणाऱ्या गोष्टी बंद करणे . ज्या प्रमाणे अनेक बसेसवर जाहिराती असतात . त्या प्रमाणे रेल्वे इंजिनावर रेल्वे डब्यावर जाहिराती रंगवणे आदी सध्याही अत्यंत अल्प प्रमाणात का होईना काही रेल्वे इंजिनावर जाहिराती असतात . मात्र त्याचे प्रमाण वाढवणे अत्यावश्यक असतात . सध्या लोक कल्याण या सबबीखाली प्रवाशी भाडे आणि प्रत्यक्ष लागणारा खर्च यातील तफावत कमी करणे . अर्थात रेल्वेभाडे वाढवणे , याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत बसण्याची शक्यता असल्याने हा धाडसी निर्णय सरकारकडून शक्यतो टाळला जातो हे थांबायलाच हवे . आपणास काय वाटते .? आपले म्हणणे आपण या पोस्टखाली मांडू शकतात . . 150वर्षाहून अधिकचा वारसा असलेली जगातील चवथ्या क्रमांकाच्या रेल्वेबाबत एका ब्लॉग पोस्टमार्फत काहीही भाष्य करणे अवघडच मात्र अनेक लोकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेली आपली भारतीय रेल्वे टिकायलाच हवी , आणि त्या हेतूनेच मी हि पोस्ट लिहली आहे . चला उठा आपली रेल्वे अधिक शक्तिशाली करण्यासाठी आपले योगदान देऊया . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?