महाराष्ट्र एसटीला पोखरणारी वाळवी

                      आपल्या सर्वांची लाडकी एसटी नुकतीच एका दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली. एसटीला
होणारा तोटा, एसटीला राज्य सरकारला द्यावे लागणारे विविध कर, अन्य प्रवासी  वाहतूकदारांकडून असणारी स्पर्धा आदी मुद्द्यांवर या निमित्याने पुन्हा एकदा विचारमंथन सुरु झाले . या  पार्श्वभुमीवर मला महाराष्ट्र एसटीच्या संदर्भात मला नुकतेच आलेले अनुभव ज्याचा माझा मते एसटीच्या तोट्याशी जवळचा संबध ते आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन
         तर मित्रांनो मी नुकताच नाशिक ते अहमदनगर, नाशिक ते  संगमनेर आणि  संगमनेर ते संगमनेर तालुक्यतील विविध गावे अशा प्रवास केला.  या प्रवासादरम्यान मला आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा कारभारातील अनेक विसंगती दिसल्या . जसे एकाच वेळी एकाच मार्गावर खूप जास्त प्रमाणात बस चालवणे. परिणामी कोणत्याही बसमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी न बसने , परिणामी काहिस्या रिकाम्या बस चालवल्यामुळे तोटा होणे . त्याच प्रमाणे बस रिकामी धावत असून देखील बस थांब्यावर प्रवासी बसची वाट बघत असताना सुद्धा सदर बसला या ठिकाणी  थांबा नाही असे सांगून प्रवाशी न घेणे . प्रवाशी
भाड्याच्या व्यतिरिक्त अन्य उत्पन्नस्रोतांबाबत फारसा उत्साह न दाखवणे . अन्य राज्यांचे  परिवहन  महामंडळे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारे व्यवसाय करत आहेत ? याचा विचार न करता धोरणे आखणे . या त्यातील काही प्रातिनिधिक उदाहरणे .
                        तर मित्रानो ,  मी जेव्हा मला महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या बसमध्ये जागा न मिळाल्याने , नाईलाजास्तव नाशिकहून अहमदनगरला जाताना गुजरात राज्य परिवहनाच्या बसमधून प्रवास केला त्यावेळी मला आढळले की, गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या सुरतहुन धरमपूर नाशिक मार्गे पंढरपूर आणि उस्मानाबाद आदी ठिकाणी जाणाऱ्या  बसेस आहेत . ज्यांना महाराष्ट्राचा नकाशा माहिती असेल त्यांना समजत असेल की , महाराष्ट्राच्या किती अंतर्गत भागापर्यंत या बसेस सेवा देत आहे  मी नाशिकला  परत आल्यावर चौकशी केल्यावर असे समजले की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसेस गुजरात राज्यात एव्हढ्या अंतर्गत भागात आपली सेवा देत नाहीत . ही गोष्ट इतपर्यंत असती तर एक वेळ
चालले असते . मी जेव्हा या बसने प्रवास केला तेव्हा समजले की सुरत ते पंढरपूर एव्हढया लांब मार्गावरील बस असून देखील ते जवळच्या मार्गाने जात नाहीत .  मी बसलेलो बस नाशिकहून अहमदनगर येथे जात असताना संगमनेर बाभळेश्वर कोलार या मार्गे आली . म्हणजेच नांदूर शिंगोटे ते लोणी (संगमनेर वगळून ) आणि लोणी ते कोलार (बाभळेश्वर वगळून ) या मार्गाने येणे शक्य असताना ते लांबचा मार्गाने गेले . रस्त्यात बाभळेश्वर येथे त्यांनी एक राहुरीच्या प्रवास घेतला . हा प्रकार येथेच थांबत नाही , सुरतहून गुजरात रस्जय परिवहन महामंडळाच्या अनेक सध्या बसेस  शिर्डीला  सुरत साक्री सटाणा मनमाड मार्गे येतात मात्र अधिक नफा मिळावा या हेतूने  गुजरात राज्य परिवहनाच्या आरामदायी सेवा देणाऱ्या व्होल्वो बसेस थोडासा लांबचा मात्र न अधिक नफा देणारा शिर्डी नाशिक सापुतारा हा मार्ग निवडतात . आणि हे होते सर्व महाराष्ट्रात .
                बर आपल्या राज्य परिवहन महामंडळाचा कारभार इथेच थांबत नाही . मी संगमनेर येथे जाण्यासाठी नाशिकच्या महामार्ग बस स्थानकावर आलो असता मला अहमदनगर येथे जाण्यासाठी ३ बसेस दिसल्या . त्या होत्या त्रंबकेश्वर ते परळी , सप्तशृंगी गड ते श्रीगोंदा आणि नाशिक ते अहमदनगर . या सर्व बसेस नाशिक ते अहमदनगर या रस्त्यावर एकाचवेळी चालणार . मी बसलेल्या बसमध्ये जवळपास 50%आसने मोकळी होती .  घरोघरी मातीच्या चुली या न्यायाने विचार केला असता अन्य बसेस मध्ये सुद्धा अशीच स्थिती असणार यात शंका नसावी . कारण  मी आलो त्यावेळी बस स्टॅण्डवर फारशी गर्दी नव्हती . संगमनेर येथून मी जेव्हा संगमनेर बाभळेश्वर मार्गावरील एक पर्यटन स्थळ निर्झरेश्वर येथे जाण्यासाठी चौकशी केली असता मला समजेल की , सादर मार्गावर धावणाऱ्या बसेसपैकी खूपच कमी बसेस त्या ठिकाणी थांबतात . परिणामी मला नाईलाजास्तव एसटी बसने प्रवास करायचा असून देखील  खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला . मी दर्शन घेऊन पार्ट आल्यावर बघतो तर बस थांब्यावर गर्दी असून देखील सादर थांब्यावर बसला थांबा नाही या सबबीवर श्रीरामपूर येथून येणाऱ्या बसेस रिकाम्या असून देखील ना
थांबता जात होत्या . मी नाशिकच्या बस स्टॅण्डवर अनेकदा कोल्हापूरला जाणाऱ्या दोन बसेस एकाच वेळी प्रवाशी गोळा करताना आणि त्याचा वेळी नाशिक कोल्हापूर मार्गाच्या बरोबर मध्यावर येणाऱ्या पुण्यासाठी सुद्धा गाडी बघितली आहे . नाशिक कोल्हापूर 80प्रवाशी असावे असे कदापि शक्य नाही मग या बसेस अर्ध्या भरून जातात आणि एसटीचा तोटा वाढतो .
या नियोजनाच्या चुकीवर लक्ष देणे अत्यावश्यक असताना एसटीला असणाऱ्या अन्य धोक्याविषयीच नेहमी गरळ ओकली जाते . हे थांबायला हवे . या विषयावर खूप काही लिहता येऊ शकते मात्र हे समज माध्यमांवरील लेखन आहे . यास काही मर्यादा आहेत वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे हे खूप मोठ्या प्रमाणात करता येत नाही, म्हणून येथेच थांबतो , नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?